सोशल मीडियावर Rashmika Mandana का होतेय ट्रोल? पाहा VIDEO

रेड वन पिसमध्ये हॉट दिसणाऱ्या रश्मिका मंदनावर आली अशी वेळ, अखेर ड्रेस सावरत झाली अन्कर्मफर्टेबल; व्हिडीओ व्हायरल

Updated: Jul 17, 2022, 06:24 PM IST
सोशल मीडियावर Rashmika Mandana का होतेय ट्रोल? पाहा VIDEO title=

मुंबई : साऊथ अभिनेत्री, नेशनल क्रश रश्मिका मंदान्नाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतला तिचा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या फोटोसोबतच तिचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत ती अन्कम्फटेबल झाल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणावरून तिला आता सर्वंच ट्रोल करू लागले आहेत. 

रश्मिका ही साऊथ इंडस्ट्रीतली आधीच मोठी स्टार आहे, त्यात आता 'पुष्पा: द राइज' या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत तिने मोठे नावलौकिक मिळवले आहे. यामुळेच रश्मिका मंदानाची क्रेझ चाहत्यांमध्ये चांगलीच वाढली आहे. 

रश्मिकाचा लुक 

रश्मिका मंदान्ना तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. रश्मिका अलीकडेच एका अवॉर्ड फंक्शनला पोहोचली होती. या अवॉर्ड शोमध्ये रश्मिका लाल गाऊनमध्ये खुपच चांगली दिसत होती. बॅकलेस लाल गाऊनमध्ये रश्मिका मंदान्ना इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले होते. 

रश्मिकाने लाल ब्लॅकलेस ड्रेससह ग्लोइंग मेकअपसह तिचा ग्लॅमरस लुक पाहण्यासाऱखा होता. न्यूड लिपस्टिक, चमकदार आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करामध्ये रश्मिकाचा लूक चाहत्यांना खुप आवडलाय. 

व्हिडिओत काय?
अवॉर्ड फंक्शनमधून परतताना काही फोटोग्राफर्सनी तिला त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली होती. तिने शॉर्ट ड्रेस परीधान केला असल्या कारणाने सोफ्यावर बसून फोटो काढणे तिला अन्कम्फटेबल वाटत होते. मात्र ती बसली आणि तीने पोझे देत फोटोही काढला.  

ट्रोल का केलं जातंय?
रश्मिकाला तिच्या ड्रेसमुळे अनेकजण ट्रोल करत आहेत. रश्मिका या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल दिसत नसल्याचे अनेकांचे मत आहे. रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओवर एका यूजरने कमेंट केली, मला ती आवडते. मात्र या ड्रेसमध्ये ती अस्वस्थ दिसत आहे. दुसर्‍या युजरने लिहिले की, असे दिसते की तिला तिच्या ड्रेसमध्ये खूप अस्वस्थ वाटत आहे. तर तिसऱ्या युजरने रश्मिकाला ट्रोल करत लिहिले, तू असा ड्रेस का घालतेस, मला समजत नाही. नीट चालता येत नाही. बसता येत नाही ही फॅशन कशी आहे? असे तो म्हणाला.