'लग्नानंतर पती अल्पसंख्याक असल्याचं जाणवलं..' मराठी अभिनेत्री रसिका आगाशेचा मोठा खुलासा

Rasika Agashe: सध्या 'स्कूप' या वेबसिरिजतून काम केल्यानंतर अभिनेत्री रसिका आगाशे आणि मोहम्मद झीशान अय्युब यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यात अभिनेत्री रसिका आगाशे हिनं आपल्या पतीबद्दल खुलासा केला आहे. 

Updated: Jul 1, 2023, 11:24 PM IST
'लग्नानंतर पती अल्पसंख्याक असल्याचं जाणवलं..' मराठी अभिनेत्री रसिका आगाशेचा मोठा खुलासा title=
rasika agashe open up about when is realised that her husband is part of minor community

Rasika Agashe: बॉलिवूडमध्ये अनेक आंतरधर्मीय विवाह झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या कहाणीबद्दल अनेकदा चर्चाही होताना दिसते. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपल्या आंतरधर्माय विवाहाबद्दल खुलासा केला आहे. सध्या सगळीकडेच त्याची याबद्दल चर्चा होताना दिसते आहे. सध्या ओटीटीवर 'स्कूप' ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्तानं या वेबसिरिजची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. हंसल मेहता यांची ही वेबसिरिज सत्य घटनेवर आधारित आहे. या सिरिजमधून करिश्मा तन्ना हिची महत्त्वपुर्ण भुमिका आहे तसेच त्याचसोबत या सिरिजमध्ये अनेक नामवंत कलाकारही आहेत. ज्याची या सिरिजमध्ये प्रमुख भुमिका आहे. अभिनेता मोहम्मद झीशान अय्युबचीही या सिरिजमध्ये महत्त्वपुर्ण भुमिका आहे त्यामुळे त्याच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. 

मोहम्मद झीशान अय्युब आणि अभिनेत्री रसिका आगाशे यांनी आपल्या एका मुलाखतीतून आपल्या संघर्षाबद्दल खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्नन याच्यासोबत झालेल्या मुलाखतीतून त्यांनी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. आगाशे एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिनं अनेक मराठी मालिका, चित्रपट, ओटीटी, जाहिरात आणि नाटकांमधून कामं केली आहेत. तिला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. 

तिनं काही वर्षांपुर्वी एक ट्विट केलं होतं. हे ट्विट एका जाहिरातबाबत होतं. तेव्हा हिंदू आणि मुस्लीम धर्मावरील एका ब्रॅंडच्या जाहिरातीला विरोध झाल्यानंतर ती जाहिरात हटवण्यात आली होती. तेव्हा रसिकानं हे ट्विट केलं होतं. त्यावर ती म्हणाली की, ''मी ते ट्विट केलं. पण त्यानंतर त्याबद्दल फारसा विचार केला नाही मी. तेव्हा सोशल मीडिया ही माझ्यासाठी नवीन गोष्ट होती. मी याबद्दल झीशानला विचारलं की मी काय केलंय. माझ्या फोनची बॅटरी संपलेली होती. त्यानं मला फोन चार्ज करून सोशल मीडियावर मला जे ट्रोल केलं जातं होतं ते ट्रोलिंग पाहण्यास सांगितलं. तेव्हा 'अच्छा यालाच ट्रोलिंग म्हणतात का' अशी माझी प्रतिक्रिया होती.'' 

हेही वाचा - आधी वजनावरून ट्रोल तर आता... नेटकरी भूमी पेडणेकरवर का संतापले

त्यानंतर ती पुढे म्हणाली की, ''मी या देशातील बहुसंख्य लोकांचा एक भाग आहे. त्यामुळे जास्त विचार न करता मी माझ्या बऱ्याच गोष्टी करते. माझी अशी इच्छा आहे की झीशानलाही फार विचार न करता माझ्याप्रमाणेच त्याही गोष्टी करता येयला हव्यात ज्या मी करते. बहुसंख्याकांचा एक भाग असल्यानं अल्पसंख्याकांना प्रत्येक गोष्टीचा इतक्या काळजीपूर्वक विचार करावा लागतो याचं मला वाईट वाटतं. माझं नाव रसिका आगाशे आहे. लोकं मला ट्रोल करण्यापुर्वी दोनदा विचार करतील. अल्पसंख्याकांनाही असंच वाटायला हवं. मला झीशानबद्दल वाईट वाटतं. मी त्याच्याशी लग्न केल्यानंतर झीशान हा अल्पसंख्याकांचा भाग असल्याचं मला जाणवलं. बहुसंख्य म्हणून आपण अशा अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत' असं रसिकानं सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मोहम्मद झीशान अय्युब आणि अभिनेत्री रसिका आगाशे एकत्र नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होते. त्यांच्या मैत्रीची सुरूवात तिथूनच झाली. त्यानंतर प्रेमात रूपांतर झाले आणि मग त्यांनी लग्न केले. रसिका ही पुण्याची आहे आणि तिनंही 'स्कूप'मधून काम केलं आहे.