मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'आरे मेट्रो 3 कारशेड' बाबतच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत आहे. मेट्रो कारशेडचा विरोध अनेक सेलिब्रिटींनी देखील केला आहे. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) देखील आहे. रवीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे.
मेट्रोकार शेडमुळे जंगलांचे नुकसान होऊ नये, असं रवीनाचं मत आहे. रवीनाच्या वक्तव्याची सध्या सोशल माडियावर तुफान चर्चा रंगत आहे. काही सोशल मीडिया युजरने रवीना आणि दिया मिर्झाला टॅग करत विचारले की उच्चभ्रूंना मध्यमवर्गीय मुंबईकरांचा संघर्ष माहित आहे का?
युजरच्या प्रश्नावर रवीनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, '1991 पर्यंत मी देखील लोकलने प्रवास केला आहे. लोकने प्रवास करताना तुमच्या सारख्या नाव नसलेल्या ट्रोलर्सने माझा शारीरिक छळ केला. यश मिळाल्यानंतर मी कार खरेदी केली....'
Uptil 1991,I travelled like this.And being a girl also got physically harassed by nameless trolls like you.Before I started working , saw success and earned my first car. Troll ji . Nagpur ke ho,hara bhara hai aap ka city.lucky.Don’t grudge anyone their success or earnings https://t.co/NW5pjEihtK
— Raveena Tandon (TandonRaveena) July 2, 2022
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'तुम्ही नागपूरचे आहात ना? तुमच्या शहरात प्रचंड हिरवळ आहे. त्यामुळे कोणाच्या यशाबद्दल आणि कमाईबद्दल राग व्यक्त करु नका...' सध्या रवीनाची पोस्ट तुफान चर्चेत आहे.
रवीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या सर्वत्र तिच्या 'Aranyak' वेब सीरिजची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर सीरिजमधील तिच्या कामगीरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.