Amrita Singh ते Neena Gupta पर्यंत, या बॉलीवूड अभिनेत्री होत्या क्रिकेटर्सच्या प्रेमात

तुम्हाला विश्वास बसणार नाही. या अभिनेत्रींची होती क्रिकेटर्सबरोबर अफेअर्स

Updated: Apr 26, 2021, 10:25 PM IST
Amrita Singh ते  Neena Gupta पर्यंत, या बॉलीवूड अभिनेत्री होत्या क्रिकेटर्सच्या प्रेमात title=

मुंबई : नगमा-सौरभ गांगुली: 2000या वर्षी नागमा आणि भारताचा माजी कर्णधार कॅप्टन सौरव गांगुलीच्या अफेअरविषयी बर्‍याच बातम्या समोर आल्या. मात्र, सौरभ आणि नागना या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कधीच खुलासा केला नाही

रवी शास्त्री आणि अमृता सिंह:  यांचा एक काळ असा होता की अमृता आणि रवी शास्त्रीच्या अफेअरर्सच्या चर्चा सगळीकडे होत्या. त्यावेळी रवी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि अमृता बॉलीवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

इमरान खान-झीनत अमान: पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचं नावही 80 च्या दशकात चर्चेत  होतं. मीडिया रिपोर्टनुसार झीनत अमानची इम्रानशी पहिली भेट पाकिस्तानमध्ये झाली होती आणि हे दोघही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते मात्र झीनत आणि इम्रानचं नातंही फार काळ टिकलं नाही

युवराज सिंग-किम शर्मा: एक काळ असा होता की युवराज आणि किम एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही माध्यमांत येत असत, पण अचानक किम आणि युवराजच्या ब्रेकअपने सर्वांना हैराण केलं.

नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स:  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा फलंदाज विवियन रिचर्ड्स रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या मीडियामध्ये प्रसारित होत्या. 80 च्या दशकात विवियन रिचर्ड्सची टीम जेव्हा भारतात आली तेव्हा दोघं पहिल्यांदा भेटले आणि प्रेमात पडले. नीना आणि विवियनला मसाबा गुप्ता नावाची एक मुलगी आहे. मात्र तरी या दोघांनी कधीही लग्न केले नाही.