करिनाने २ मुलांच्या बापाशी लग्न करण्याआधी..तिला असे भयानक सल्ले दिले गेले...

सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करीनाला बर्‍याच लोकांनी घाबरवलं होतं. 

Updated: Apr 26, 2021, 09:49 PM IST
करिनाने २ मुलांच्या बापाशी लग्न करण्याआधी..तिला असे भयानक सल्ले दिले गेले... title=

मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खान काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. सैफ-करीनाला बॉलिवूडचं परफेक्ट कपल म्हणणं चुकीचे ठरणार नाही. मा६, तुम्हाला माहिती आहे का? की सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करीनाला बर्‍याच लोकांनी घाबरवलं होतं. लग्नाआधी करिनाला लोक तिला सांगत की, सैफसोबत लग्न केल्यावर तुझं करिअर बरबाद होईल. करिना कपूरने एकदा 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या.

करीना म्हणाली होती की,, 'मी जेव्हा सैफशी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा प्रत्येकजण मला सांगायचं की तो घटस्फोटित  आहे, त्याला दोन मुलंही आहेत. काय तु शोअर आहेस की तु त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहेस? ”करिना पुढे म्हणाली,“ काहींनी तर असं सांगितलं की, सैफबरोबर लग्नानंतर तुझं संपूर्ण करिअर खराब होऊ शकते. तुझं नाव खराब होईल ”

करिना पुढे म्हणाली, "खरंच प्रेम करणं खूप मोठा गुन्हा आहे?" चला आता तर लग्न करून बघते आणि काय होते ते बघतेच' सैफ करीनाने वर्ष 2012 मध्ये काहीकाळ लिवइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. सैफचं हे दुसरे लग्न होतं. यापूर्वी सैफ अली खानने अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले आणि 2004 साली त्यांचा घटस्फोट झाला.