मुंबई : टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री आणि बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा क्रिकेट आणि बॉलिवूड वर्तुळात सुरू आहेत. एका इंग्रजी दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत, रवि आणि निमरत गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलंय. ही बातमी इतकी चर्चिली गेली की सोमवारी रवि शास्त्री आणि निमरत कौर ट्विटरवर ट्रेन्ड होताना दिसले.
3 सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या चर्चेवर सायंकाळी निमरतनं एक ट्विट करून यावर अप्रत्यक्षरित्या ट्विट केलं... 'सत्य : मला रुट कनालची गरज असू शकते. काल्पनिक : याशिवाय मी माझ्याबद्दल जे काही वाचलं' असं निमरतनं ट्विटरवर म्हटलं.
Fact: I may need a root canal. Fiction: Everything else I read about me today. More facts: Fiction can be more hurtful, monday blues exist and I love ice cream. Here’s to trash free happy days ahead
— Nimrat Kaur (@NimratOfficial) September 3, 2018
मात्र, प्रतिक्रियेसाठी रवि शास्त्री उपलब्ध नव्हते. कारण ते सध्या इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत आहेत. या चर्चांबद्दल जेव्हा त्यांना समजलं तेव्हा एका वर्तमानपत्राशी बोलताना या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत त्यावर काहीही बोलण्यास रवि शास्त्री यांनी नकार दिला.
याबद्दल फोनवर जेव्हा रवि शास्त्री यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 'या अफवेवर बोलण्यासारखं काहीही नाही'... यावर त्यांना विचारण्यात आलं की त्यांची निमरत यांच्याशी शेवटची बेट कधी झाली होती. यावर त्यांनी चिडून 'जेव्हा मी सांगतोय की या अफवा आहेत तेव्हा तुम्हाला समजायला हवं'...
मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, निमरत आणि रवि शास्त्री यांची भेट 2015 मध्ये एका लग्झरी कार लॉन्चिंग कार्यक्रमान दरम्यान झाली. रवि शास्त्री आणि निमरत यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून अफेअर सुरू आहे. परंतु, या अफवा असल्याचं आता रवि आणि निमरत या दोघांनीही स्पष्ट केलंय.