पत्नीसमोर अभिषेक बच्चनने करिश्माला दिली अशी वागणूक

पाहा हा व्हिडिओ

पत्नीसमोर अभिषेक बच्चनने करिश्माला दिली अशी वागणूक

 मुंबई : ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं ब्रेकअप लोकप्रिय आहे. अगदी तसच अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या मोडलेल्या साखरपुड्याची देखील जोरदार चर्चा रंगली. साखरपुडा तुटल्यानंतर या दोघांनी अनेक ठिकाणी एकमेकांना टाळायचं ठरवलं. नुकतंच श्वेता बच्चनने आपल्या एका क्लोदिंग ब्रँडची सुरूवात केली. याच्या लाँचिंगवेळी संपूर्ण बच्चन कुटुंब सहभागी होतं. श्वेताने अनेक कलाकारांसोबत करिश्मा कपूरला देखील आमंत्रण दिलं होतं.

करिश्या या कार्यक्रमाला काळ्या रंगाचा सूट घालून पोहोचली. या कार्यक्रमाला अभिषेक पत्नी ऐश्वर्यासोबत होता. जेव्हा हे दोघं मीडियाला पोझ देत होते तेव्हा करिश्मा तेथेच उपस्थित होती. पण अभिषेकने करिश्माकडे दुर्लक्ष केलं. मात्र श्वेताने करिश्माचं खूप चांगल स्वागत केलं. दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली आणि मीडियाला पोझ देखील दिली. मात्र ऐश्वर्याच्या येण्याने तिने काही खास प्रतिक्रिया दिली नाही. यावरून सोशल मीडियावर खूप मस्करी केली जात आहे.करिश्माने यावेळी सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडेसोबत फोटो देखील काढले. या संपूर्ण कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली.