'श्यामची आई' पाहायला जाण्याअगोदर वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

श्यामची आई या पुस्तकाबद्दल ऐकलंच असेल, आता जेव्हा ही  कादंबरी  चित्रपटाच्या रूपात  पडद्यावर येते म्हंटल्यावर प्रत्येकाच्या मनाची  उत्सुकता शिगेला पोहचलीच असणार. अत्रेंचा श्यामची आई हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला माहितच आहे, आता एकविसाव्या शतकात दिग्दर्शक म्हणून सुजय डहाकेने श्यामची आई हा चित्रपट पुन्हा कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक आँफ व्हाईट रूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

Updated: Nov 14, 2023, 11:29 AM IST
'श्यामची आई' पाहायला जाण्याअगोदर वाचा सिनेमाचा रिव्ह्यू title=

नमिता सुर्यवंशी (झी मीडिया, मुंबई)
लहानपणा पासून श्यामची आई या पुस्तकाबद्दल ऐकलंच असेल, आता जेव्हा ही  कादंबरी  चित्रपटाच्या रूपात  पडद्यावर येते म्हंटल्यावर प्रत्येकाच्या मनाची  उत्सुकता शिगेला पोहचलीच असणार. अत्रेंचा श्यामची आई हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला माहितच आहे, आता एकविसाव्या शतकात दिग्दर्शक म्हणून सुजय डहाकेने श्यामची आई हा चित्रपट पुन्हा कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक आँफ व्हाईट रूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट हा श्यामची आई या कादंबरीवर आधारित असून काही निवडक दृश्य समान दाखवली आहेत.

चित्रपटाचं कथानक  
चित्रपटाची सुरुवातीला मोठ्या साने गुरुजींची परिस्तिथीचे दर्शन घडविते. या सीनमध्ये त्यांचं तुरुंगातील जीवन, त्यांची देशभक्ती दिसून येते आणि जेव्हा त्यांची रवानगी नाशिक जेलमध्ये होते. त्यांनतर होणाऱ्या  श्यामची  आई ह्या कादंबरीचा जन्म.  पोहण्यासाठी लहानग्या श्यामने  खाल्लेला आईचा मार, लालसा आली म्हणून आईने दिलेला ओरडा, चोरी केली म्हणून दिलेली शिक्षा  त्यातच तिचे दिसलेले प्रेम याचा उत्तम मेळ अभिनेत्री गौरी देशपांडेनी केला आहे. या सगळ्यामुळे श्यामच्या जीवनावर झालेला परिणाम, शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊन राहणं, आईचं आजरपण,स्वातंत्र लढ्यात सहभाग होणं या सर्वावर  चित्रपट अधोरेखित केला आहे.

चित्रपट कसा आहे.. 
हल्लीच्या चित्रपटांत रंगांचे खेळ खेळले जात असताना सुजय डहाकेनी कृष्णधवल थीम स्वीकारून चित्रपटाला एक पारंपरिक स्पर्श दिला आहे. जो  प्रेक्षकांना साने गुरुजींच्या काळात जाण्याचे आवाहन करते आणि Theatre मध्ये अजून उठावदार दिसून येतो. सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद सारंच एकरुप झालंय. म्हणजे कधी कधी कथा सुंदर असूनही पटकथेमुळे सिनेमा संथ होऊ शकतो किंवा कठीण संवादांमुळे बोजड इथं मात्र प्रत्येक बाजू एकमेकांना पूरक आहे. पण जर तुम्ही या सिनेमात साने गुरुजी यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी ही अपेक्षा ठेवून गेला असाल तर मात्र तुमचा हिरोमोड होऊ शकतो. कारण या सिनेमातील फोकस संपुर्णपणे श्याम आणि त्याच्या आईवर आहे. 

कलाकारांचा अभिनय
या सिनेमात श्यामच्या आईच्या  भूमिकेत  गौरी देशपांडे आहे. हा तिचा  पहिला मराठी सिनेमा आहे. गौरीच्या अभिनेत्री म्हणून असलेल्या जमेच्या बाजू आणि तिच्या मर्यादा यांचा व्यवस्थित अभ्यास करुन तिने चौकटीत रुक्मिणीला रेखाटली आहे. त्यामुळे अगदी सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून ते क्लायमॅक्सपर्यंत कुठेही त्या भूमिकेचा तोल जात नाही. तिचा प्रेम, राग, माया, जपलेला स्वाभिमान , बिनदिक्कतपणे सांगणारा बंडखोर स्वभाव,  नवऱ्याच्या स्वाभिमान जपणारी , पाप पुण्याची गणितं कशी आपल्यापद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करणारी बायको या साऱ्या छटा तिने कमाल रंगवल्या आहेत. ती सहजता तिच्या अभिनयात दिसते. लहानग्या श्यामच्या भूमिकेत असणाऱ्या शर्वचं  कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याचा अल्लड द्वाडपणा,आईवरील प्रेम, आपल्या लहान भावंडाना मोठ्या बहिणी सारखा सांभाळणार श्याम त्याने साकारला आहे.

संदीप पाठक यांनी श्यामचे बाबा या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे संयम हा त्या व्यक्तिरेखेचा आत्मा आहे आणि संदीप पाठक यांनी  तेवढ्याच संयतपणे तो साकारलाय. त्याच्या डोळ्यांमधली सात्विकता, त्याची शब्दफेक, स्तोत्र म्हणतानाची तल्लीनता ते सारं पाहाताना आपल्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात. .  या कथेतील हळूच लक्ष वेधून घेणार पात्र म्हणजे दुर्वांची आज्जी जेष्ठ अभिनेत्री जोती चांदेकर यांनी ही  भूमिका साकारली आहे. ही   दुर्वांची आज्जी संपूर्ण कथेला खूप छान आधार देते.

ओम भुतकरने साकारलेले साने गुरुजी हे या भूमिकेत त्याने त्यांच्या  मनाची प्रत्येक अवस्था, प्रत्येक भावना निगुतीने टिपली आहे. सारंग साठ्ये, मयूर मोरे, सुनिल अभ्यंकर, उर्मिला जगताप,  अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.  या साऱ्यांनीच आपल्या वाट्याला आलेली भूमिका तेवढ्याच ताकदीने पार पाडली आहे. 

दिग्दर्शन
सुजय डहाके यांनी दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. लोकांना ती आवडत आहे. ज्याला सोबतही छान मिळाली आहे. कॅमेरा अंगल्स, visual communication चांगल्या प्रकारे सीननुसार टिपले आहे..

संगीत - 
महेश काळे, आणि अशोक पत्की यांच्या हाती संगीताचा विडा असल्याने गाणी खूपच चर्चेचा विषय बनली आहेत. "भरजरी ग पितांबर" गाणे ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो हे काही खोटे नाही.त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे हे दिसते.. सुर सुंदर आहेत, प्रत्येक किस्सा मागे संगीत वाजते जे ते दृश्य खुलवायला आणखीन मदत करते.शेवटी हेच, की एकंदरीत चित्रपट उत्तम केला आहे. लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे,दिग्दर्शकाचे धाडस कामी आले आहे आणि उत्तम प्रतिसादाने आणखीन एक मराठी सिनेमा वरती आला आहे. या संपुर्ण सिनेमाचं परिक्षण करता आम्ही या सिनेमाला देतोय 3 स्टार...