IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 (IPL 2025) साठी मेगा ऑक्शन सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पार पडत आहे. मेगा ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडूंना प्रत्यक्ष ऑक्शनसाठी निवडण्यात आले होते. 24 नोव्हेंबर रोजी रविवारी एकूण 72 खेळाडूंना फ्रेंचायझींनी विकत घेतलं. तर सोमवारी दुसऱ्या दिवशीही अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यंदा ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंच नशीब चमकलं. यापैकीच एक हिरा धोनीच्या सीएसकच्या गळाला लागला. काही दिवसांपूर्वीच रणजी ट्रॉफीमध्ये एका इनिंगमध्ये तब्बल 10 विकेट्स घेऊन इतिहास रचणारा गोलंदाज अंशुल कंबोजवर (Anshul Kamboj) ऑक्शनमध्ये कोट्यवधींची बोली लागली.
अंशुल कंबोज हा ऑल राउंडर खेळाडू असून रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळतो. अंशुलने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. मात्र मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले. अंशुल कंबोज जेव्हा ऑक्शन टेबलवर आला तेव्हा 30 लाख ही त्याची बेस प्राईज होती. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यवर बोली लावली. नंतर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स दोघांमध्ये अंशुलला खरेदी करण्याची चुरस रंगली. त्यामुळे अंशुलची बोली 30 लाखांवरून थेट 3 कोटींपर्यंत पोहोचली. अखेर चेन्नई सुपरकिंग्सने 3.40 कोटींना त्याला विकत घेतले.
हेही वाचा : धोनीच्या लाडक्याचं घरवापसीचं स्वप्न भंगलं, ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला
अंशुल कंबोज अलीकडेच त्याच्या रणजी ट्रॉफीतील परफॉर्मन्समुळे प्रकाशझोतात आला होता. जेव्हा त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. एकाच डावात 10 बळी घेण्याचा विक्रम करणाऱ्या गोलंदाजांमध्ये कंबोजचे नाव नोंदवले गेले. तामिळनाडूकडून खेळताना त्याने हा पराक्रम केला. अंशुल कंबोज मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल 2024 मध्ये 3 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या.