बिग बींपासून विभक्त होताच रेखा यांच्या आयुष्यात 'या' अभिनेत्याची एन्ट्री

बिग बी आणि रेखा यांची 'अधुरी कहाणी....', त्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत बहरला प्रेमाचा गुलाब, रेखा यांनी लग्नाची मागणी केल्यानंतर...  

Updated: Sep 29, 2022, 12:07 PM IST
बिग बींपासून विभक्त होताच रेखा यांच्या आयुष्यात 'या' अभिनेत्याची एन्ट्री

मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री  रेखा (Rekha) रुपेरी पडद्यापासून दूर असल्यातरी त्यांच्या चर्चा कायम रंगत असतात. फक्त अभिनयच नाही तर, त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं. सिनेमामध्ये तर रेखा यांना प्रचंड प्रेम मिळालं, खासगी आयुष्यात त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर तर झाली, पण नशीबाला काही वेगळंच मान्य होतं. 

एक काळ होता जेव्हा रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांचं नातं फार घट्ट होतं. बिग बी यांचं आधीच लग्न झालं होतं, पण असं असूनही रेखासोबतचं त्यांच्या अफेअरचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. पण हे नातं अधिक काळ टिकू शकलं नाही (Amitabh bachchan with rekha)

'ती' होती बिग बी- रेखा यांची शेवटची भेट, अखेर सत्य समोर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा यांच्या आयुष्यात लोकप्रिय अभिनेता राज बब्बर (raj babbar) यांच्यासोबत जवळीक वाढली होती. असं म्हटलं जातं की, राज बब्बर हे त्यांची दुसरी पत्नी स्मिता पाटील (smita Patil) यांच्या निधनामुळं पूर्णपणे कोलमडून गेले होते. या काळात रेखा यांनीच त्यांना आधार दिला होता. 

रेखा आणि राज यांच्यातील जवळीक या दरम्यानच्या काळात वाढली. ते दोघंही एकमेकांसोबत वेळ व्यतीत करू लागले. पण रेखा यांनी जेव्हा राज बब्बर यांच्याकडे लग्नाचा विषय काढला होता तेव्हा त्यांना नकारार्थी उत्तर मिळालं होतं. (rekha with raj babbar)

राज यांनी दिलेलं हे उत्तर आणि पहिल्या पत्नीकडे परत जाण्याची व्यक्त केलेली इच्छा रेखा यांना हादरा देऊन गेली. या दोघांमध्ये बरीच शाब्दिक बाचाबाची झाली, ज्यानंतर रेखा तिथून तडक निघाल्या आणि अनवाणी पायांनी मुंबईच्या रस्त्यांवरून त्या आपल्या घराच्या दिशेनं निघाल्या. त्या प्रसंगानंतर रेखा यांनी आयुष्याच्या या वळणाकडे पुन्हा कधीच वळून पाहिलं नाही.