रेखा यांनी ऐश्वर्या राय बच्चनला लिहीलं होतं पत्र, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठला आहे.

Updated: Sep 27, 2021, 03:21 PM IST
रेखा यांनी ऐश्वर्या राय बच्चनला लिहीलं होतं पत्र, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठला आहे. आज लाखो लोक तिचे चाहते आहेत. त्याचबरोबर 2017 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये 20 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी ऐश्वर्याला पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी ऐश्वर्याचं अभिनंदन केलं आणि तिच्या कारकीर्दीतील यशाचा उल्लेख करून तिचं खूप कौतुकही केलं. 

या पत्रात रेखा यांनी ऐश्वर्याला आराध्याची आई म्हणूनही संबोधलं होतं. खरंतर फार कमी लोकांना माहित आहे की, रेखा आणि ऐश्वर्यामध्ये एक विशेष नातं आहे. दोघंही एकमेकांचा खूप विचार करतात आणि ऐश्वर्या रेखाला रेखा माँ म्हणते.

तु प्रत्येक पात्र छान साकारलं आहेस
रेखा यांनी या पत्रात लिहिलं आहे की, 'तुझ्यासारखी स्त्री ही त्या नदीसारखी आहे. जी कोणत्याही बनावटतेच्या पुढे चालू इच्छिते. ती आपल्या गोल्स पर्यंत पोहचते जी आपली ओळख गमावू देत नाही. त्यांनी असंही लिहिलं आहे की, जरी लोकं हे विसरले असतील की, तु काय सांगितलस. तु काय केलस. मात्र लोकं हे कधीच विसरणार नाहीत की, तु लोकांना कशी जाणीव करुन दिलीस की, तु तुझ्यामध्ये पूर्ण आहेस. तुला कुणालाच काहीच सिद्ध करण्याची गरज नाही.

तु आराध्याची आई असणं हे मला सगळ्यात जास्त आवडतं 
रेखाने यांत असंही लिहिलं की, 'बाळा, तू खूप मोठा पल्ला गाठला आहेस. या प्रवासात तु अनेक अडथळे पार केलेस आणि नंतर उंचीही गाठलीस. तु आतापर्यंत सगळ्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेस. आणि आराध्याच्या आईचं तुझं पात्र मला सगळ्यात जास्त आवडतं. मी तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करते. खूप सारं प्रेम, आयुष्यवंत हो, रेखा माँ... '