रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Updated: Dec 31, 2020, 06:09 PM IST
रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता रेमो डिसूझाच्या तब्येतीत सुधारणा होतेय आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र त्याच्या या कठीण प्रसंगी त्याला साथ दिली बॉलिवूडच्या दबंग सलमान खाननं.. रेमोने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानचं कौतुक करत त्याचे धन्यवाद मानलेत..

 "सलमान खानला आम्ही देवदूत म्हणतो. कारण सगळ्यांची मदत करायला तो नेहमीच पुढे असतो.  सलमान आणि माझं जास्त बोलणं होत नाही. खरंतर माझी पत्नी लिझेल आणि सलमान सर खूप चांगले मित्र आहेत. मला रुग्णालयात दाखल केल्यानंतर लिझेलने सलमान सरांना फोन केला. मी रुग्णालयात असताना सहा दिवस त्याने माझी विचारपूस केली. त्याने डॉक्टरांशीही वैयक्तिकरित्या विचारपूस केली.

रेमो डिसूझा हा बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफर्सपैकी एक आहे. त्यानं आजवर अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत.  'रेस 3' या चित्रपटात सलमान खान आणि रेमोने एकत्र काम केले आहे.