'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक

Heeramandi : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर तिने 'हिरामंडी' सिनेमातील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 11, 2024, 10:11 AM IST
'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक  title=

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' सिनेमात 'लज्जो'ची भूमिका साकारली आहे. ऋचा चड्ढा हिने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. पण या सिनेमातील सर्वात कठीण सीन कोणता आणि त्यासाठी तिला 200 बॅग्राऊंड डान्सरसमोरच्या एका लाजिरवाण्या प्रसंगाला सामोर जावं लागलं. 

रिचा चड्ढाने मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्यासोबत या शोमध्ये 'हिरामंडी'सिनेमातील बिहाइंड द सीन शेअर केले. सेटवरील अनुभव शेअर करताना मनीषा कोईराला म्हणाली की, "आम्ही थकलो आहोत असे आम्हाला कधीच वाटलं नाही... म्हणजे, आम्ही थकलो होतो... पण आपण काही तरी चांगल करत असल्याचं समाधान होतं. 

99 वेळा रिटेक 

ऋचा चड्ढा म्हणाली की, माझा जो सर्वोत्तम दिवस होता तोच सर्वात सर्वात वाईट दिवस ठरला.  ती म्हणाली, "जेव्हा डान्स सिक्वेन्स दरम्यान रिटेकचा होत होते, तेव्हा माझ्याकडे सर्वाधिक स्कोअर होता. कारण मी 99 रिटेक घेतले ! मी शेंच्युरी मारता मारता राहिली. ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. 200 ते 300 एक्स्ट्रा कलाकार डान्सर तुमच्यासमोर आहेत आणि तुम्ही सतत अयशस्वी होत आहे. तुमच्यासोबत जवळपास 200-300 एक्स्ट्रा नाचताना हे सोपे नसते. आणि तुम्हाला पाहणे. पुन्हा पुन्हा अयशस्वी होतो, पण जेव्हा मला ते शक्य झालं तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा होता. 

लज्जोची भूमिका साकारली 

संजय लीला भन्साली यांच्या 'हिरामंडी' या वेबसिरीजमध्ये ऋचा चड्ढाने 'लज्जो'ची भूमिका साकारली आहे. वेब सिरीजमध्ये तिचा स्क्रीन टाईम कमी होता पण दमदार होता. तिने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. या वेब सिरीजमध्ये ऋचाला दोन पात्रांची ऑफर आली होती. एका मुलाखतीत रिचाने हे पात्र निवडण्यामागचे कारण सांगितले आहे. ऋचाने सांगितलं की, हिरामंडळीमध्ये तिला दोन रोल ऑफर केले होते. वेब सीरिजचे शो रनर संजय यांनी तिला कोणता रोल हवा हे विचारलं. 'लज्जो' या कॅरेक्टरला खूप स्क्रीन टाईम होता. पण माझ्यासाठी त्यात नवीन काय आहे हे ओळखून मी लज्जोची निवड केली, असं ऋचा सांगते. 

ऋचा जुलैमध्ये मुलाला देणार जन्म

ऋचा चढ्ढा यांनी फेब्रुवारीमध्ये तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता बातमी अशी आहे की, ती जुलैमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. आजकाल ऋचा गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत आहे आणि तिच्या हिरामंडी या वेब सिरीजचं सतत प्रमोशन करत आहे. प्रमोशन संपताच ती तिच्या मुलावर लक्ष केंद्रित करेल. ऋचाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, 'हिरामंडी' नंतर ती आता 'मिर्झापूर 3' आणि 'मेट्रो इन दिन'मध्ये दिसणार आहे.