झाल्या चुकीला माफी द्या; पश्चातापाच्या आगीत भस्म झालेल्या Bigg Boss अभिनेत्याची हळहळ

१४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आजही होतोय त्रास.... अभिनेत्याची कोर्टात धाव 

Updated: Feb 21, 2022, 12:55 PM IST
झाल्या चुकीला माफी द्या; पश्चातापाच्या आगीत भस्म झालेल्या Bigg Boss अभिनेत्याची हळहळ  title=

मुंबई : Right To be Forgotten : बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या आयुष्यातील एक गोष्ट विसरायची आहे. यासाठी अभिनेत्याने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे अभिनेता आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे. 

आपल्या आयुष्यात घडलेली घटना विसरणं सोपं नसतं. मग ती घटना कितीही जणू असली तरीही. पण अभिनेत्याला ती घटना कायद्याच्या मदतीने विसरायची आहे. भारतासाठी हे नवं प्रकरण आहे. 

Right To be Forgotten या अधिकाराच्या मदतीने अभिनेता आशुतोषला त्याच्या आयुष्यातील ती कटू आठवण विसरायची आहे. 

काय आहे Right To be Forgotten हा कायदा? आठवण विसरायची म्हणजे नक्की काय? ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. याबद्दल अनेकांना माहित नाही. ती आपण जाणून घेऊया.

न्यायालयात गेलं प्रकरण 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता आशुतोष कौशिक यांना आपल्या आयुष्यात घडलेली एक भयानक घटना विसरण्याची परवानगी हवी आहे. यावर न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे अभिनेत्याटे म्हणणे आहे. 

या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १ एप्रिलची तारीख दिली आहे. 

कौशिक यांना कोर्टाने Right To be Forgotten हा अधिकार द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. अर्जात अभिनेत्याने म्हटले आहे की, त्यांची एक चूक त्यांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे. जी सुमारे 14 वर्षांपूर्वी घडली होती.

काय आहे विसरण्याचा अधिकार 

गुन्हा विसरण्याचा अधिकार ‘Right to be Forgotten’ म्हणजे आपली वैयक्तिक माहिती जी सार्वजनिक केली आहे. ती इंटरनेटवरून काढावी. या अधिकाऱ्याला यूरोपीय संघ (EU) मार्फत मान्यता देण्यात आली आहे. परंतु तिथे देखील असं पूर्णपणे नाही. पण भारतासाठी ही अगदी नवी गोष्ट आहे. 

कोण आहे हा अभिनेता ज्याने न्यायालयात घेतली धाव 

जिला गाझियाबाद फेम अभिनेता कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यांच्या अर्जात असे लिहिले आहे की जुन्या लेखांमुळे तो खूप दुखावला गेला आहे आणि मानसिकदृष्ट्या दुखावला गेला आहे. 

न्यायालयाने भारत सरकार, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, गुगल यांना विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून त्यांच्याशी संबंधित असलेली माहिती काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

अपमान होण्यामागचं कारण 

अभिनेता खूप वर्षांपूर्वी दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडला गेला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला 2500 रुपयांचा दंड ठोठावला. 

त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स एक वर्षासाठी निलंबित केला.  त्याला दिवसभर न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ही घटना चर्चेची ठरली. 

ज्याच्याशी संबंधित अनेक बातम्या, फोटो, व्हिडिओ आजही इंटरनेटवर आहेत.