लग्नाआधीच गरोदर असणाऱ्या सेलिब्रिटीची अतरंगी फॅशन ; पाहून नेटकरी हादरले 

ही प्रसिद्ध गायिका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Feb 10, 2022, 05:57 PM IST
लग्नाआधीच गरोदर असणाऱ्या सेलिब्रिटीची अतरंगी फॅशन ; पाहून नेटकरी हादरले  title=

मुंबई : हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना लवकरच आई होणार आहे. रिहाना सध्या तिच्या गर्भधारणेचा आनंद घेत आहे. रिहानाचं लग्न झालेले नाही आणि ती तिचा बॉयफ्रेंड रॉकीच्या मुलाची आई होणार आहे. रिहाना तिच्या पहिल्या मुलाबद्दल खूप उत्साहित आहे. काही दिवसांपूर्वी रिहाना तिचा बॉयफ्रेंड रॉकीसोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसली होती. यादरम्यान रिहाना तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. आता पुन्हा एकदा रिहाना ब्लॅक ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लाँन्ट करताना दिसत आहे. जाणून घ्या रिहाना तिच्या बॉयफ्रेंड पहिल्यांदा कुठे भेटली होती..

रिहानाने घट्ट लेगिंग्जसोबत ब्लॅक टॉप घातला होता. रिहानाचा बेबी बंप समोरून स्पष्ट दिसत आहे. यासोबत रिहानाने काळी टोपी घातली आहे. 2021मध्ये meet gala कार्यक्रमात रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी पहिल्यांदाच रेड कार्पेटवर एकत्र दिसले होते.

सिंगरचं हसीन जमीलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रिहाना आणि रॉकीची लव्हस्टोरी प्रकाशझोतात आली. रिहानाची गणना सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. रिहाना, आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी यांनी 2021 मध्ये आपलं नातं सगळ्यांसमोर कबूल केलं. 

रिहानाचा बॉयफ्रेंड रॉकीने एका मुलाखतीत रिहानाला 'माझ्या आयुष्यातील खूप जवळची व्यक्ती म्हणत त्यांचं नातं कबुल केलं होतं. या मुलाखतीत जेव्हा रॉकीला पहिल्यांदा वडील होण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, 'मला वाटतं की मी एक परफेक्ट वडिल होईन.''

रिपोर्ट्सनुसार, रिहानाची एकूण संपत्ती 1.7 मिलियन डॉलर आहे. 2021 च्या फोर्ब्सच्या अहवालानुसार, रिहानाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत तिचं संगीत नसून तिची फेंटी ब्युटी कॉस्मेटिक्स लाइन आहे. रिहानाची ब्युटी कंपनी खूप लोकप्रिय आहे.रिहानाचा हा  ब्रँड 50 स्किन टोनसाठी फाउंडेशनची श्रेणी ऑफर करतो. हे प्रोडक्ट्स 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. रिहाना सोशल मीडिया हँडलमधूनही भरपूर कमाई करते.

रिहानाने वयाच्या १७ व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली.  2007 मध्ये रिहानाच्या 'गुड गर्ल गॉन बॅड' या अल्बमने जगाला हादरवले. या अल्बममुळे रिहानाला देश-विदेशात प्रसिद्धी मिळाली. रिहानाने अनेक ग्रॅमी आणि बिलबोर्ड संगीत पुरस्कार जिंकले आहेत.