प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा होणार आई; लग्नाशिवाय दुसऱ्यांदा प्रेग्नंट

प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेग्नंसीच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे.

Updated: Feb 20, 2023, 08:28 PM IST
प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा होणार आई; लग्नाशिवाय दुसऱ्यांदा प्रेग्नंट title=

मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर रिहाना तिच्या गाण्यांपासून तिच्या फॅशन सेन्सपर्यंत सर्वांनाच चकित करते. म्युझिक इंडस्ट्रीसोबतच फॅशन इंडस्ट्रीतही रिहानाचा प्रभाव दिसून येतो. पण गेल्या वर्षभरात तिच्या फॅशन आणि अल्बमशिवाय रिहाना तिच्या प्रेग्नेंसीमुळेही चर्चेत आली होती. गेले वर्ष रिहानासाठी खूप खास होतं कारण गायिकेने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.

याबद्दल सर्वजण आनंदी असतानाच आता रिहानाने एक अशी घोषणा केली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत करणार आहेत. नुकताच रिहानाने तिचा बेबी बंप दाखवत लाइव्ह परफॉर्मन्स दिला आहे. मुख्य म्हणजे ती  लग्नाशिवाय दुसऱ्यांदा मुलाचे स्वागत करणार आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर्स आहे.

अमेरिकेत दरवर्षी होणार्‍या सर्वात मोठ्या फुटबॉल इव्हेंटमध्ये नेहमीच जगातील काही मोठ्या संगीतकार परफॉर्म करत असतात. या कार्यक्रमात रिहानाही परफॉर्म करण्यासाठी आली होती. रिहानाने सुपर बाउल LVII मध्ये भाग घेतला आणि बेस्ट परफॉर्मन्स दिला. दरम्यान रिहानाच्या बेबी बंपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर सिंगरच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेलाही पुष्टी मिळाली आहे. सोशल मीडियावर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. रिहाना आधीच एका मुलाची आई आहे्

रिहाना दुसऱ्यांदा आई होणार
हॉलिवूड गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत. आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी हे जोडपं खूपच उत्सुक आहे. रिहानाने अलीकडेच एका कार्यक्रमात तिचा बेबी बंप फ्लॉंट केला. रिहाना परफॉर्मन्सदरम्यान पोट रब करताना दिसली आणि तिच्या कपड्यांची झिपही तिने उघडी ठेवली. यादरम्यान तिने तिचा बेबी बंपही फ्लॉन्ट केला.

 अजून रिहानाचं लग्न झालेलं नाही
रिहानाने 2021 मध्ये तिचा प्रियकर रॉकीसोबतच्या रिलेशनशिपची अधिकृतपणे पुष्टी केली होती. एका मुलाखतीत रॉकीने रिहानाला 'लव ऑफ माय लाइफ' असंही म्हटलं होतं. यानंतर ग्रॅमी विजेती रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड रॅपर एस्पी रॉकी यांनी 2022 मध्ये त्यांच्या मुलाचं स्वागत केलं.  जरी रिहानाने अद्याप लग्न केले नाही. रॉकी आणि रिहाना जुने मित्र आहेत. दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.