मुंबई : दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची प्रसिद्ध आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयावर आणि लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या दिपीकासारखी हुबेहूब दिसाणारी एका मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डिजिटल क्रिएटर रिजुताचा फोटो-व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. जेव्हा युजर्सना वाटतं की, ती हुबेहुब दीपिका पदुकोणसारखी दिसते. रिजुताने एका न्यूज पोर्टलला सांगितलं की, तिला सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या कमेंट्स पहायला मिळतात, त्यापैकी काही तिचा लूक पाहून तिरस्कार करतात तर काही तिच्या लूकवर प्रेमही करतात.
दीपिका पदुकोण सारखी दिसणारी रिजुता घोष देब:
रिजुता घोष देब हिने आपल्या संभाषणात सांगितलं आहे की, ती लोकांच्या प्रत्येक प्रतिक्रियेचा आदर करते. ती म्हणाली की, अनावश्यक द्वेष हा या व्यासपीठाचा एक भाग आहे. ज्याला ती कधीही पसंत करत नाही. मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण निवडक असायला हवं. रिजुताला ओळख आणि प्रेमासोबतच सोशल मीडियावर लोकांच्या द्वेषाचाही सामना करावा लागत आहे.
सोशल मीडियावर तिरस्काराचा करावा लागतो सामना
रिजुता घोष देबचा फोटो-व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर अनेक कमेंट करत आहेत आणि लिहितायेत की, 'स्वस्त मूव्ही व्हर्जन' आणि 'फर्स्ट कॉपी'. कोलकातामध्ये जन्मलेली डिजिटल निर्माता तिच्या मानसिक आरोग्यासाठी या कमेंटकडे दुर्लक्ष करते. टीव्ही शो जिंकणारी आलिया भट्टची लूक सारखी सेलेस्टी बैरागी. हीचं उदाहरण देताना रिजुता म्हणाली की, व्हायरल होण्याचेही फायदे आहेत. लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशा संधी मिळत आहेत याचा मला आनंद होतोय, असंही ती म्हणाली.
रिजुता शाळेत असताना 'ओम शांती ओम' रिलीज झाला होता आणि तेव्हापासून लोकं तिला दीपिका पदुकोण सारखी दिसत असल्याचं सांगत होते. रिजुताचा असा विश्वास होता की, त्यांच्यात काही समानता आहे आणि ते देखील खूप वेगळे आहेत.