मुंबई : ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कन्नड चित्रपट 'कांतारा'ची (Kantara) जादू अजूनही कायम आहेत. कारण सिनेमा रिलीज झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही बक्कळ गल्ला जमवत आहे. या चित्रपटाने बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खुप चर्चा आहे.
पौराणिक कथांवर आधारित 'कांतारा' (Kantara) कन्नडमध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की त्याच्या निर्मात्यांनी कांतारा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज केला. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 23 दिवसांचा मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत त्याचा वेग अजूनही कायम आहे.
ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) 'कांतारा' (Kantara) चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) थांबत नाही आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत, तरीही चित्रपट पडद्यावर तुफान चालतोय. चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने चौथ्या शनिवारी 4 कोटी 15 लाखांचा आकडा सेट केला आहे. त्यानुसार चित्रपटाने 57 कोटी 90 लाखांची कमाई केली आहे.
ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) हा केवळ 'कांतारा'चा (Kantara) मुख्य अभिनेता नाही, तर त्याने या चित्रपटाची कथा लिहिली आणि दिग्दर्शितही केली आहे.चित्रपटाची कथा ग्रामीण पार्श्वभूमीवर आहे. जंगल आणि मानवाच्या संघर्षावर बनलेल्या या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका गावावर आधारित आहे. चित्रपटात ऋषभ शेट्टीशिवाय सप्तमी गौडा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय किशोर आणि अच्युत कुमारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.