ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यात 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी एक बातमी समोर येत आहे. ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 25, 2024, 11:23 AM IST
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यात 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद title=
Thane Water Cut Supply Disruption in Several Areas on December 26 and 27 for Pipeline Repairs

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाण्यातील काही भागांत दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. दिनांक 26 आणि 27 डिसेंबर रोजी पाणी पुरवठा दोन दिवस 24 तास बंद असणार आहे.  त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं अवाहन करण्यात येत आहे. 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.

या कामामुळं परिणामी, गुरूवार दिनांक 26/12/2024  रात्री 12.00 ते शुक्रवार दिनांक 27/12/2024 रात्री 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं अवाहन करण्यात येत आहे. पाणीपुरवठा बंद कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (विभाग क्र. 26 व 31 मधील काही भाग वगळता) आणि कळवा विभाग समितीचे सर्व भाग आणि वागळे प्रभाग समिती अंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरू नगर आणि मानपाडा विभागीय समिती अंतर्गत येणाऱ्या कोलशेत खालचा गावातील पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.