मुंबई : गुरवारी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. मुंबईच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६७व्या वर्षी त्याचं निधन झालं. ऋषी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी रणबीर कपूर, नीतू सिंग, रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर,अरमान जैन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, आदर जैन ही मंडळी उपस्थित होती. परंतु, ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकली नाही. त्यामुळे आता ती लवकरच मुंबईत आईला भेटण्यासाठी येत आहे.
सोशल मीडियावर तिने केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. 'आई मी घरी पोहोचत आहे.' अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर देखील दिल्लीहून निघाली होती. पण चार्टर प्लेनची परवानगी नाकारल्याने ती पोहोचू शकली नाही.
मुंबईला जाण्यासंदर्भातील परवानगी तिला गृहविभागाकडून मिळाली होती. पण तिची चार्टर प्लेनची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे ती रस्त्यामार्गे मुंबईला यावे लागत आहे.
मोठ्या पडद्यावर १९७० ते १९९० हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.