जेनेलियाने लग्नाचे फोटो दाखवताच, रितेश देखमुखच्या चेहऱ्याचा रंग का बदलला?

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांना गोंडस जोडपे म्हणून ओळखले जाते.

Updated: Apr 3, 2021, 06:17 PM IST
जेनेलियाने लग्नाचे फोटो दाखवताच, रितेश देखमुखच्या चेहऱ्याचा रंग का बदलला? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांना गोंडस जोडपे म्हणून ओळखले जातं. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडते. हे दोघेही अनेकदा आपले मजेदार व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, आणि आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. अलीकडेच रितेश देशमुखने एक थ्रोबॅक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर  केला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचे  हसू आवरणार नाही.

लग्नाच्या फोटोंवर रितेशचा चेहरा उतरला

रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या इन्स्टाग्रामवर एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जेनेलिया (Genelia Deshmukh) त्याच्यासोबत बसली आहे. या व्हीडिओमध्ये जेनेलिया रितेशला त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवते, तेव्हा हसणाऱ्या रितेशचा चेहरा लगेच उतरतो. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या आगोदरही  रितेश आणि  जेनेलियाचा (Genelia Deshmukh) व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रितेश प्रिती झींटाची गळा भेट घेत आहे, आणि  रितेशने (Riteish Deshmukh) तिला किस देखील केले. त्यावेळी जेनेलिया तिथेच उभी होती, आणि रितेशची ही वागणूक पाहून अचानक तिच्या चेहऱ्यावरून हसू गायब झाले. जेनेलियाने यावर 'घरी चला तुम्हाला दाखवते' अशा प्रकारचा एखादी बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून बोलते अगदी तशीत रीएक्शन दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या व्हीडिओला मिळेलेल्या पसंती नंतर, त्याच्याशी संबंधीत एक व्हिडिओ रितेशने (Riteish Deshmukh) शेअर केला त्या व्हिडिओमध्ये रितेशने प्रिती झींटाला केलेल्या ला किसमुळे  जेनेलिया (Genelia Deshmukh) खूप मारत आहे असे पाहायला मिळत आहे. या दोन्हीही व्हीडिओंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आणि शेअर देखील केले गेले. त्यावर लोकांनी मजेदार मीम्स आणि कमेंट्स देखील केले आहे.