लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर रितेशकडून जिनिलयाबद्दलची मोठी गोष्ट उघड, तो व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असतो. 

Updated: Jan 1, 2022, 02:05 PM IST
लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर रितेशकडून जिनिलयाबद्दलची मोठी गोष्ट उघड, तो व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सेलिब्रिटींचं वैयक्तीक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या डेली लाईफमधील खास क्षण पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. आणि म्ङणूनच कलाकार आपले हॅपी मुव्हमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. 

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असतो. तो मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करताना दिसतो. कधी पत्नी जिनिलिया देशमुखसोबत रोमान्स करताना व्हिडिओ तो पोस्ट करतो. तर कधी मुलांसोबत वेळ घालवताना तो दिसतो. 

 रितेश आणि जिनिलियाची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. सध्या रितेशने जिनिलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 यावेळी रितेशने जिनिलियाच्या एका सवयीची टिंगल उडवली आहे. जिनिलियाची सवय म्हणजे वस्तू एकीकडे ठेवायच्या आणि दुसरीकडे शोधत बसायच्या. आणि मग सगळ्या लोकांना त्या शोधण्यासाठी भाग पाडायचं. रितेशने तिची अॅक्टिंग करून दाखवलीय. जेनेलिया नेहमी फोन पर्समध्ये सायलेंट मोडवर ठेवते आणि मग अख्ख घर शोधते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर घराची चावी हरवते तेव्हाही असंच होतं आणि ती सापडते तिच्या पर्समध्येच, पण त्यामुळे त्रास लोकांना होतो. अशा प्रकारचा एक व्हिडिओ रितेशने शेअर करत पत्नीच्या या सवयीचा खुलासा केला आहे.

तरीही व्हिडिओ शेअर करत त्यांने माझी परफेक्ट वाईफ असं कॅप्शन दिलं आहे.