अभिनेत्याने जेनेलियाने लगावली कानशिलात; 13 वर्षांनंतर रितेशने घेतला 'बदला'

पत्नीला कानशीलात लगावल्यानंतर रितेश संतापला, व्हिडिओ व्हायरल 

Updated: Oct 24, 2021, 11:08 AM IST
अभिनेत्याने जेनेलियाने लगावली कानशिलात; 13 वर्षांनंतर रितेशने घेतला 'बदला'

मुंबई :  अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखने एकापेक्षा एक चित्रपटात मुख्य भूमिका साकारत अनेक हीट चित्रपट दिले. 'तुझे मेरी कसम' चित्रपटात रितेशसोबत काम केल्यानंतर जेनेलियाने 'जाने तू या जाने ना' चित्रपटात अभिनेता इमरान खानसोबत काम केलं. चित्रपटाने सर्वांच्या मनात घर केलं. एवढंच नाही तर 'पप्पू कान्ट डान्स' हे गाणं आजही पब-डिस्कोमध्ये वाजतं. चित्रपटातील एक सीन सध्या तुफान चर्चात आला आहे. चित्रपटात जेनेलिया अभिनेता अयाज खानच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका बजावली होती. 

तेव्हा अयाजने जेनेलियाच्या कानशीलात लगावली होती. तेव्हा अयाजने लगावलेल्या कानशिलाचा बदला रितेशने आता घेतला आहे. अजायने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रितेश अयाजला मारताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत अयाजने कॅप्शनमध्ये, 'हे शत्रूत्व कधी थांबेल...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'तुझे मेरी कसम' या सिनेमात पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाने एकत्र काम केलं. या दरम्यानच दोघं प्रेमात पडले. 10 वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुलगे आहेत. कामाबद्दल बोलायचं झालं तर रितेश 'बागी 3' या सिनेमात दिसणार असून जेनेलिया सध्या सिनेसृष्टीपासून लांब आहे.