रितेशची स्विमिंगपूलमध्ये अशी करामत? जवळच्या व्यक्तीकडून व्हिडीओ शूट

व्हिडीओ पोस्ट होताचं सोशल मीडियावर व्हायरल   

Updated: Feb 12, 2022, 09:39 AM IST
रितेशची स्विमिंगपूलमध्ये अशी करामत? जवळच्या व्यक्तीकडून व्हिडीओ शूट  title=

मुंबई : रितेशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असेलेला व्हिडीओ खुद्द रितेशच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या सर्वत्र रितेशच्या व्हिडीओची चर्चा आहे. टीव्ही विश्वाची ड्रामा क्विन राखी सावंत सध्या फक्त आणि फक्त पती रितेश आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. 

आता राखीने रितेशचा स्विमिंगपूलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश व्हिडीओमध्ये प्रसिद्ध बंगाली गाणं 'कच्चा बदाम'वर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज नेटकऱ्यांना फार आवडत आहे. 

त्यांच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'बदाम बदाम झूम बराबर... झूम बराबर..  रितेश झूम... पूममध्ये...' सध्या राखीची ही भन्नाट पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, रितेशला आपला पती म्हणवणारी राखी आता म्हणे, तो माझा चांगला मित्र आहे आणि आपल्यामध्ये आता फक्त मैत्रीच असल्याचं तिने सांगितलं. 

एका मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं की, 'बिग बॉस 15' मधून बाहेर आल्यानंतर रितेश आणि तिचं नातं मैत्रीपुरताच मर्यादीत आहे. रितेशची बरीच प्रकरणी ही न्यायप्रविष्ठ आहेत. 

सध्या तो हा गुंता सोडवण्यावर लक्ष देत आहे. त्यामुळे मी यावर फार काही बोलू शकत नाही, असं राखी म्हणाली. राखी आणि रितेश कायम एकत्र अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.