आर.के.स्टुडिओला लागलेल्या आगीत 'हा' स्टेज झाला खाक

चेंबूर येथील आर.के.स्टुडिओ हा बॉलिवूडमधील काही जुन्या स्टुडिओंपैकी एक आहे.

Updated: Sep 16, 2017, 07:37 PM IST
आर.के.स्टुडिओला लागलेल्या आगीत 'हा' स्टेज झाला खाक  title=

मुंबई : चेंबूर येथील आर.के.स्टुडिओ हा बॉलिवूडमधील काही जुन्या स्टुडिओंपैकी एक आहे.

आज दुपारी दोनच्या सुमारास या स्टुडिओला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग झपाट्याने वाढत गेली. त्यानंतर सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाच पाण्याचे टँकर यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.  
आर.के.स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक आयकॉनिक स्टुडियो जळाल्याची माहिती अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. 

 

आर.के. स्टुडिओमध्ये पहिल्या क्रमांकाच्या स्टेजवर ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोचा स्टेज होता. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आधी पडद्यांना आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण स्टेज जळून खाक झाला.आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

 राज कपूर यांनी १९४८ साली चेंबूर येथे आर. के. स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओने ‘आग’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. यासोबतच‘आवारा’,‘श्री ४२०’,‘बॉबी’,‘मेरा नाम जोकर’,‘सत्यम् शिवम् सुंदरम्’,‘प्रेमगंथ’,‘आ अब लौट चले’यांसह अनेक हीट चित्रपटांची निर्मिती या स्टुडिओने केली. त्यापैकी ‘श्री ४२०’ आणि ‘एक दिन रत्रे’या बंगाली चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.