Shah Rukh Khan starrer Jawan Movie : सध्या देशभरात जवान सिनेमा ( Jawan Movie ) तुफान गाजतोय. सिनेमा देखील बंपर कमाई करताना दिसतेय. मात्र यावेळी शाहरूख खानला एक मोठा धक्का बसला आहे. यावेळी शाहरुख खानची पत्नी गौरी खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटने रोहित शर्मा नावाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान हा रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार नसून दुसरा व्यक्ती असल्याचं समोर आलंय.
यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने फेसबुकच्या पेरेंट मेटा आणि टेलीग्रामला कठोर निर्देश दिलेत की, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ( Jawan Movie ) लीक करणाऱ्या ग्रुप्स किंवा चॅनल्सची बेसिक सबस्क्राइबर इन्फॉर्मेशन (BSI) देण्यात याव्यात. यावेळी आदेशात न्यायालयाने जवान चित्रपट लीक करणाऱ्यांचे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगण्यात आलं आहे.
यावेळी दिल्ली हायकोर्टाने रोहित शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात रेड चिलीज एंटरटेनमेंटने याचिका दाखल केली होती. गौरी खानच्या कंपनीकडून असा आरोप कऱण्यात आला की, रोहित शर्मा नावाची व्यक्तीने परवानगीशिवाय चित्रपटाशी संबंधित कॉपीराइट केलेल्या गोष्टी प्रसारित केल्या आहेत.
या याचिकेमध्ये दोन्ही प्लॅटफॉर्मला त्या ग्रुप्स आणि चॅनल्सला निलंबित करण्याचे निर्देश द्यावेत, असं कोर्टाला सांगण्यात आलंय. न्यायालयाने मेटाला रोहित शर्माचे व्हॉट्सअॅप खातं सस्पेंड करण्याचे आणि त्याचे फेसबुक पेज 'रोहित मुव्हीज' तसंच इन्स्टाग्राम हँडल ब्लॉक करण्याचे निर्देश दिलेत.
याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती शंकर म्हणाले की, वेबसाईटचे मालक/नियंत्रक शेड्यूल ‘डी’ मध्ये येतात. न्यायालयाने म्हटलंय की, संबंधित सामग्रीसह याचिकाकर्त्याला कॉपीराईट असलेल्या कोणत्याही सामग्रीची अनधिकृत कॉपी करणं, प्रसारण करणं, प्रसारित करणं किंवा उपलब्ध करून देणं या सर्वांना तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिलेत.
न्यायालयाने शर्मा यांना रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या योग्य परवान्याशिवाय चित्रपटातील कोणतंही चित्र, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप, गाणी किंवा रेकॉर्डिंग कॉपी, रेकॉर्डिंग करण्यास मनाई केली आहे.
हायकोर्टाने शर्मा यांना निर्देश दिले आहेत की, 'जवान' चित्रपटाशी संबंधित गोष्टींसह फिर्यादीच्या कॉपीराइटचे उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामसह सर्व सोशल मीडिया अकाऊंटमधून काढून टाकावी.