रोहित शेट्टी आणि अजय देवगण लागले ‘सिंघम ३’ तयारीला

बॉलिवूड सिनेमांचां दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच अशी माहिती समोर येत आहेत की, रोहित लवकरच अजय देवगणसोबत ‘सिंघम ३’ सिनेमाचं काम सुरू करणार आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 10, 2017, 07:23 PM IST
रोहित शेट्टी आणि अजय देवगण लागले ‘सिंघम ३’ तयारीला title=

मुंबई : बॉलिवूड सिनेमांचां दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच अशी माहिती समोर येत आहेत की, रोहित लवकरच अजय देवगणसोबत ‘सिंघम ३’ सिनेमाचं काम सुरू करणार आहे. 

असे असेल तर तर पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत अजय देवगण डरकाळी फोडण्यास तयार झाला आहे.  अजय देवगण हा त्याच्या अभिनयासाठी आणि अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. त्याच्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘शिवाय’मध्येही त्याचा अ‍ॅक्शन अंदाज बघायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा त्याची गाजलेली बाजीराव सिंघम ही भूमिका बघायला मिळण्याची शक्यता आहे. 

बॉलिवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अजर आणि रोहित लवकरच ‘सिंघम ३’ चं काम सुरू करणार आहेत. त्यासोबत अजय एकापाठी एक अशा ५ सिनेमांमधून प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ सोबतच अजय ‘सन्स ऑफ सरदार’चीही तयारी करतो आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या ‘तानाजी’ सिनेमाचीही घोषणा केली होती. इतकेच नाहीतर एस.गिल यांच्यावरील बायोपिकमध्येही तो दिसणार आहे. 

या सिनेमांसोबतच अजयची ‘बादशाहो’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षकांना या सिनेमाचा ट्रेलर पसंत पडत आहे. या सिनेमातही अजय अ‍ॅक्शन मूडमध्ये दिसत आहे. सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.