लग्नाच्या चर्चांनंतर रणबीर-आलियाचा हा फोटो तुम्ही पाहिलात... 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नेहमीच चर्चेत असतात. 

Updated: Feb 13, 2022, 01:39 PM IST
लग्नाच्या चर्चांनंतर रणबीर-आलियाचा हा फोटो तुम्ही पाहिलात...  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नेहमीच चर्चेत असतात. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या सतत समोर येत असतात. ब्रह्मास्त्र या चित्रपटात आलिया आणि रणबीर एकत्र दिसणार आहेत.

या दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्रह्मास्त्राबाबत चाहत्यांमध्ये उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्माते काही ना काही शेअर करत असतात. आता ब्रह्मास्त्रमधील रणबीर आणि आलियाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बुडलेले दिसत आहेत.

फोटोमध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांच्या डोळ्यात मग्न झालेले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये एक मोठा गेट आहे.ज्याच्या एका बाजूला रणबीर आणि दुसऱ्या बाजूला आलिया आहे. दोघांनी एकमेकांचा हात धरला आहे. दोघांची झलक पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. ब्रह्मास्त्रमधील रणबीरच्या कॅरेक्टरचं नाव शिव आणि आलियाच्या कॅरेक्टरचं नाव ईशा आहे.

रणबीर आणि आलियाला हा फोटो पाहून चाहते त्यांच्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, खूप गोंडस. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय, शिव आणि ईशा पडद्यावर जादू करतील. त्याचबरोबर अजून एका चाहत्याने लिहिलंय की, मला आशा आहे की, हा चित्रपट आमच्या अपेक्षा पूर्ण करेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ब्रह्मास्त्रावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.