कपाळावर कुंकू, साधा ड्रेस, सोबत आई आणि भाऊ; प्राजक्ता माळीवर का आली स्पष्टीकरणाची वेळ?

Prajakta Mali: आपल्यावर स्पष्टीकरण देण्याची ही वेळ का आली? याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 28, 2024, 06:35 PM IST
कपाळावर कुंकू, साधा ड्रेस, सोबत आई आणि भाऊ; प्राजक्ता माळीवर का आली स्पष्टीकरणाची वेळ?
प्राजक्ता माळी

Prajakta Mali: कपाळावर लाल कुंकू, अंगावर साधा ड्रेस आणि सोबत आई-भाऊ... मुंबई मराठी पत्रकार संघात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भरल्या डोळ्यांनी आपली बाजू मांडली. मागचे दीड महिने मी शांत राहिले पण आज बोलण्याची वेळ आली, असं त्या म्हणाल्या. आपल्यावर ही वेळ का आली? याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले.काय म्हणाल्या प्राजक्ता? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

साधारण दीड महिन्यांपूर्वी करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. करुणा यांनी आपल्या लाईव्हमध्ये धनंजय मुंडेंसोबत काही महिलांची नावे जोडली. यामुळे प्राजक्ता माळीला त्रास सहन करावा लागला. तिच्य प्रत्येक पोस्टवर ट्रोलिंग सुरु झाली. तरीही मी शांत राहिले असे प्राजक्ता यांनी सांगितले. या प्रकारानंतर माझ्या लीगल टीमने करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्याचे प्राजक्ताने सांगितले. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पाठीशी उभे राहायला हवे. तिच्यावर लांछन टाकू नये.तुम्हीदेखील एक महिला आहात, त्यामुळे महिलांना कशाप्रकारे बदनामीला सामोरे जावे लागते हे तुम्हाला चांगलेच माहिती असेल. त्यामुळे एका महिलेची अशाप्रकारे बदनामी करु नका असे आवाहन प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांना केले. 

आई आणि भाऊ सोबत 

पत्रकार परिषदेत आई आणि भाऊ प्राजक्ता माळी यांच्यासोबत होता. माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा घरच्यांवर खूप परिणाम झाला. माझ्या भावाने सोशल मीडियात येणाऱ्या कमेंट्स वाचून त्याचं अकाऊंट बंद केल्याचे त्यांनी सांगितले. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितले. कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या कर्तुत्वावर नाव कमावणाऱ्या महिलांना अशाप्रकारच्या लांछनांना सामोरे जावे लागते, असे प्राजक्ता माळी यांनी यावेळी म्हटले. वारंवार होणाऱ्या अशा ट्रोलिंगमुळे पीडित व्यक्ती नैराश्येत जाऊ शकते. तिच्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येऊ शकतात. त्यामुळे हे वेळीच रोखायला हवं असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

का आली स्पष्टीकरणाची वेळ?

एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला. ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही.लोकप्रतिनीधी यावर टिपण्णी करतात. यांना लोकांनी निवडून दिलंय. हे आपल्यावर चिखलफेक करतात. पण काल सुरेश धस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं. लोकप्रतिनिधीला लाखो लोकं फॉलो करतात. एखादी गोष्ट खरी असल्याचे ते भासवतात. त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More