मुंबई : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिने तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. खरंतर अमलाने तिचा प्रियकर जगत देसाईला तिच्या वाढदिवसदिवसी शुभेच्छा दिल्या आहेत. अमलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जगत तिला अंगठी घालताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमला आणि जगत एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी जगत गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की. 'माझी जिप्सी क्विन 'हो' म्हणाली. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.' अमलाने 2009 मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या मल्याळम चित्रपट 'नीलथमारा'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, जगत आपल्या कुटुंबासह गोव्यात राहतो आणि एका लक्झरी व्हिलाचा तो मॅनेजर आहे. अमला आणि जगत काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. काही आठवड्यांपूर्वीच दोघांनीही एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची माहिती दिली होती. हे अमलाचं दुसरे लग्न असेल. यापूर्वी, तिने 2017 मध्ये दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केलं होतं, परंतु 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
अमला पॉल का खूबसूरत रिएक्शन
अमला पॉलनेही जगत देसाईंचं हे प्रपोज सुंदरपणे स्वीकारलं. अमला पॉलने आधी तिचा बॉयफ्रेंड जगत देसाईला किस केलं आणि त्यानंतर तिने त्याला होकार दिला. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमला पॉल आणि जगत देसाई लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी अमला पॉलने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केलं होतं. मात्र तीन वर्षांनंतर त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमला पॉल रिलेशनशिपमध्ये आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.