'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार? RRR Making Video मध्ये आलिया, अजयचं दमदार प्रदर्शन

पाहा राजमैली यांच्या नव्या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ...

Updated: Jul 16, 2021, 09:46 AM IST
'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार? RRR Making Video मध्ये आलिया, अजयचं दमदार प्रदर्शन  title=

मुंबई : 'बाहुबली' चित्रपटाचा आपल्यावर चढलेला क्रेझ आजही आठवत आहे. 'बाहुबली' चित्रपटाच्या दोन्ही भागांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. पण आता 'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी एक मोठ्या बजेटचा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार आहे. एसएस राजमैली पुन्हा एकदा मोठा चित्रपट घेवून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.  राजमैलीयांच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तर राजमैली यांनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर फेअर केला आहे.

सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. व्हिडिओमध्ये दिसत असणारा चित्रपटाचा सेट प्रचंड भव्य आहे. चित्रीत करण्यात आलेल्या थरारक सीनची एक झलक राजमैली यांनी मिकिंग व्हिडिओच्या माध्यमातून दाखविली आहे. व्हिडिओमध्ये ज्यूनियर एनटीआर (Jr NTR), राम चरण (Ram Charan) और अजय देवगन (Ajay Devgn) से लेकर आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळत आहे.

राजमैली यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या चित्रपटाचे हॅशटॅग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आता मेकिंग व्हिडिओ समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. राजमैली यांच्या बाहुबली चित्रपटानं 750 कोटी तर बाहुबली 2 या चित्रपटानं 1080 कोटींचा आकडा पार केला होता. त्यामुळे राजामौली यांच्या आगामी 'आरआरआर' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'आरआरआर' या चित्रपटाचं बजेट हे ३०० कोटी एवढं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चुलबुली गर्ल आलिया भट ही रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर सिंघम अजय देवगण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आह

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x