Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

Oscars 2023: RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेश मिळाले होते. इतकचं काय तर कार्यक्रमात गाण्याचा लाइव्ह पर्फॉर्मन्स देखील होता. आरआरआर चित्रपटातील गाण्यानं आपल्याला ऑस्कर मिळवून दिला आहे. त्यामुळे यंदाचं ऑस्कर हे भारतीयांसाठी खूप खास राहिलं आहे. 

Updated: Mar 19, 2023, 04:58 PM IST
Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे title=

RRR Team Paid Fees To Get Seat In Oscar 2023 : दाक्षिणात्य चित्रपट 'आरआरआर' च्या (RRR) 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला ऑस्करमध्ये (Oscars 2023) ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. चित्रपटातील गाण्याला नॉमिनेश मिळाल्यानं चित्रपटाची टीम ही ऑस्करसाठी पोहोचली होती. यासाठी अभिनेता राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S. Rajamauli) यांनी हजेरी लावली होती. मात्र, आता अशी माहिती समोर आली आहे की रिपोर्ट्सनुसार, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि त्यांच्या कुटुंबासाठी ऑस्कर 2023 मध्ये सीट्स विकत घेतल्या होत्या. 

इकोनॉमिक्स टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली आणि त्यांचे कुटुंबीय. ‘नाटू नाटू’ गाण्याचे गीतकार चंद्रा बोस, संगीतकार एम. एम. कीरावानी, ज्युनियर एनटीआर, त्याची पत्नी आणि राम चरण त्याच्या पत्नीसोबत पोहोचले होते. पण या सगळ्यांना ऑस्करमध्ये सीट्स मिळाल्या त्या फ्रीमध्ये मिळाल्या नव्हत्या. तर त्या सीट्स मिळवण्यासाठी ऑस्कर 2023 मध्ये प्रत्येक सीटसाठी त्यांना एक ठरावीक रक्कम मोजावी लागली होती. तर ही रक्कम किती असेल असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. तर याची किंमत ही 25 हजार डॉलर्स म्हणजेच 20.6 लाख आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑस्कर 2023 हा 12 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. हा अवॉर्ड शो भारतीयांना 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता आला. तर ऑस्कर 2023 लॉस एन्जलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये झाला होता. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार असे म्हटले जाते की ऑस्करमध्ये 'नाटू नाटू' चे कम्पोझर एमएम कीरावनी आणि लिरिसिस्ट चंद्र बोस यांनाच फक्त फ्री पास देण्यात आले होते. त्यांना फ्री पास देण्याचे कारण म्हणजे त्यांना नॉमिनेशन मिळालं होतं म्हणून. तर आरआरआरची टीम एस. एस. राजामौली, राम चरण, ज्युनियरल एनटीआर आणि त्यांच्या कुटुंबानं ऑस्कर लाइव्ह पाहण्यासाठी तिकिटाची खरेदी केली होती. 

हेही वाचा : Kartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!

ऑस्कर 2023 मध्ये नाटू नाटू गाण्यावर प्रेक्षकांना लाइव्ह पर्फॉर्मन्स पाहता आला होता. यंदाचं ऑस्कर हे आपल्या सगळ्यांसाठी खासं होतं. कारण आपल्याला यंदा तीन नॉमिनेशन मिळाले असून त्यातील आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला.