रुबिना दिलीक Oops momentची शिकार...वाऱ्यामुळे उडू लागला ड्रेस आणि....

अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्रीला हायस्लिट ड्रेस घालणं महागात पडलं आहे.

Updated: May 8, 2022, 10:28 AM IST
रुबिना दिलीक Oops momentची शिकार...वाऱ्यामुळे उडू लागला ड्रेस आणि.... title=

मुंबईः अभिनेत्री रुबिना दिलीकने तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्रीला हायस्लिट ड्रेस घालणं महागात पडलं आहे. रुबिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या ड्रेसमुळे खूपच नर्व्हस दिसते आहे.

अभिनेत्री रुबिना दिलीक टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकापेक्षा एक बोल्ड फोटोज शेअर करत असते. या पुन्हा एकदा तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुबिना शूटिंग सेटवर जात असताना पापाराझींनी तिला स्पॉट केलं. यादरम्यान रुबिना पर्पल कलरच्या गाऊन ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, पण तिच्या बोल्डनेसमध्ये भर घालणाऱ्या ड्रेसची हाय स्लिटही तिच्यासाठी अडचणीची ठरली होती. खरंतर, या वेळी खूप जोरदार वारा होता त्यामुळे रुबिनाचा ड्रेस उडू लागला.

वर उडणारा ड्रेस सावरत रुबिनाने पोज दिल्या मात्र या ड्रेसमुळे ती खूपच अनकम्फर्टेबल झालेली दिसली. त्यामुळे रुबिनाने पापाराझींना फारशा जास्त पोजही दिल्या नाहीत. काहीजण घाईघाईत तिचा ड्रेस हाताळताना आत गेले. आता रुबिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिच्या नवीन फोटोशूटची छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करत असते. रुबिनाचे चाहते तिच्या सौंदर्यासोबतच फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सचेही वेडे आहेत.रुबिनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच वेगाने व्हायरल होतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x