आईनेच 50 कोटींचा दावा ठोकल्यानंतर रुपाली गांगुलीच्या मुलीने आधी फोटो डिलीट केले अन् आता म्हणते, 'तिचा खरा चेहरा...'

टीव्ही शो 'अनुपमा' स्टार रुपाली गांगुली सध्या तिच्या सावत्र मुलीच्या वादामुळे चर्चेत आहे. ईशा वर्माने लावलेल्या आरोपामुळे रुपालीने तिच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. या सगळ्या प्रकरणावर ईशाने शेवटची प्रतिक्रिया दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 28, 2024, 11:20 AM IST
आईनेच 50 कोटींचा दावा ठोकल्यानंतर रुपाली गांगुलीच्या मुलीने आधी फोटो डिलीट केले अन् आता म्हणते, 'तिचा खरा चेहरा...' title=

कधी टीआरपीमध्ये टॉपमध्ये असलेली 'अनुपमा' सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली आणि तिची सावत्र मुलगी ईशा वर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. जो वाद थांबण्याच नावच घेत नाही. 

ईशा वर्माने इंस्टाग्राम स्टोरीजमधून रुपालीने केलेल्या 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलंय. या पोस्टमध्ये ईशाने लिहिलं आहे की, एका मुलीला खरं बोलण्यासाठी कधीच शिक्षा मिळू नये. आपल्या सावत्र भावाचा रुद्रांशचा उल्लेख करताना ईशाने म्हटलं की, मी कधीच त्याला या वादात सहभागी करुन घेतलं नाही. तसेच या सर्वात मोठ्या पोस्टमध्ये ईशाने लिहिले की, ही शेवटची पोस्ट असून या प्रकरणावर आता यापुढे ती काहीच बोलणार नाही. 

रुपाली गांगुलीकडून 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा 

ईशा वर्माद्वारे कायमच सावत्र आईवर वेगवेगळे आरोप लावण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर गांगुलीने 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. या सगळ्यावर ईशाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईशाने सांगितलं की, सावत्र आईला त्रास देण्यासाठी नाही तर तिचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. 

इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Verma (@eshav.official)

या सगळ्या वादात ईशाने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टवर तिने वडिलांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी तिने चाहत्यांसोबत शेअर केला असून कठीण निर्णय घेण्याबबात आपली भावना व्यक्त केली. 

माझ्यासाठी आतापर्यंतचं सर्वात कठीण काम 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Verma (@eshav.official)

ईशाने लिहिलं की, माझ्या या निर्णयाने सोशल मीडिया आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बोलणं हे माझ्यासाठी अतिशय कठीण काम होतं. पण माझ्या जीवनातील महत्तपूर्ण बदल आहे. अनेक वर्षांपासून असलेलं माझं गुपित तोडलं आहे.