300 कोटींचा चित्रपट, 18 अभिनेते मिळून करणार 'या' चित्रपटात काम , पाहताचं तुम्ही म्हणाल हा चित्रपट आहे की, बिग बॉसचे घर...

'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आलेले आहे. अशातच साजिद नाडियाडवालानं हाऊसफुलच्या टीमचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत कलाकारांची इतकी मोठी रांग आहे की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल, कारण 'या' चित्रपटात तब्बल 18 कलाकार आहेत. 

Intern | Updated: Nov 27, 2024, 05:53 PM IST
300 कोटींचा चित्रपट, 18 अभिनेते मिळून करणार 'या' चित्रपटात काम , पाहताचं तुम्ही म्हणाल हा चित्रपट आहे की, बिग बॉसचे घर... title=

'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आलेले आहे. अशातच साजिद नाडियाडवालानं हाऊसफुलच्या टीमचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलीन फर्नांडीज, सोनम बाजवा, नरगिस फाकरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर हे सर्व कलाकार दिसत आहेत. हे सर्व कलाकार एकाच चित्रपटात आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटात हे सगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. जर एवढे कलाकार एकाच चित्रपटात असतील तर एक अभिनेता आपल्याला किती वेळ दिसू शकतो? अस वाटतं आहे की, हा चित्रपट नाही तर बिग बॉसचा पुढचा सिझनचं आहे. 

शूटिंग संपतचं आलयं 
या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवालाने अनाउंन्स केले आहे की, या चित्रपटाचे शूटिंग शेवटच्या टप्प्यात आहे . सोशल मीडियावर साजिद नाडियाडवालाने एक फोटो शेअर केला. ज्यात या चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. या चित्रपटाची टीम एवढी मोठी आहे तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचं आला असेलचं की या चित्रपटाचं पोस्टर कसं दिसेल. हा चित्रपट 6 जून 2025 ला प्रदर्शित होणार आहे .

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सगळेचं प्रसिद्ध कलाकार आहेत. या चित्रपटाचा सीक्वेलची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलेले. त्यानंतरचं साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाचा सीक्वेल काढण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे एकुण 4 सीक्वेल आलेले आहेत. दुसरा भाग 2012 मध्ये, तिसरा भाग 2016,  तर चौथा भाग 2019मध्ये आलेला. या चित्रपटाचा पुढील सीक्वेल 2025मध्ये येणार आहे. अक्षय कुमारचे तब्बल 10 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 'या' चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे, पण एवढ्या कलाकारांमध्ये अक्षय कुमार आपलं स्वतःचं स्थान पुन्हा निर्माण करेल की नाही? हा प्रश्न सगळ्यांनाचं पडला आहे.