ट्रेनमध्ये आरामात झोपली होती अभिनेत्री, मात्र समोरच्या माणसाने...

जेव्हा तुम्ही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत असता, तेव्हा तुम्हाला खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

Updated: Oct 11, 2021, 08:29 PM IST
ट्रेनमध्ये आरामात झोपली होती अभिनेत्री, मात्र समोरच्या माणसाने...  title=

मुंबई : जेव्हाही तुम्ही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत असाल, तेव्हा तुम्हाला खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जेणेकरून तुमचं सामान चोरीला जाऊ शकत नाही. पण अलीकडेच एक ब्रिटिश अभिनेत्री सबरीना अलौचे हिच्यासोबत असं काही घडलं आहे, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा मानवतेचा अभिमान वाटेल.

गाढ झोपेत होती सबरीना
अलीकडेच, एक ब्रिटिश अभिनेत्री सबरीना अलौचे हिने तिच्या ट्रेन प्रवासाचा एक अतिशय हृदयस्पर्शी अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. सबरीनानं लिहिलंय की, 'अलीकडे लंडनला परतल्यावर मी अशा प्रकारे झोपले की मला कशाचीही जाणीव नव्हती. मी समोरच्या टेबलवर माझी बॅग उघडी ठेवली होती आणि माझा मोबाईल टेबलवरच ठेवला होता. माझ्या कानात माझे एअरपॉड्स होते. गाणी ऐकत मी खूप गाढ झोपी गेले.

समोर बसलेला भितीदायक माणूस
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'जेव्हा ट्रेन इस्टनला पोहोचत होती, तेव्हा मी उठले, तेव्हा मी टेबलच्या दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती बसलेली पाहिली. सबरीनाच्या लक्षात आलं की त्या डब्यातील इतर शेजारच्या जागा रिकाम्या होत्या आणि काही अंतरावर काही नशेत असलेले प्रवासी होते जे खूप दंगा करत होते. अभिनेत्रीला आश्चर्य वाटलं की, ही अनोळखी व्यक्ती तिच्या समोर का बसली आहे. ती इतर रिकाम्या सीटवर का बसत नाही. झोपेतून उठल्यावर तिने ताबडतोब तिचं सामान तपासलं जे सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं. सबरीनाचे स्टेशन आल्यावर ती खाली उतरू लागली. तोपर्यंत तिला तो माणूस खूप विचित्र आणि भीतीदायक वाटला.

त्या अनोळखी व्यक्तीने बॅग केली होती संरक्षित 
जेव्हा सबरीना खाली उतरली, तेव्हा ती व्यक्ती तिला म्हणाली, 'मला तुम्हाला घाबरवायचं नव्हतं, तुम्ही तुमचं सामान असंच उघडं ठेवून झोपला होतात, म्हणून मी इथे बसलो.' हे ऐकून सबरीना स्तब्ध झाली. तिने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'ती व्यक्ती तिथे बसून होती जेणेकरून मी शांतपणे झोपू शकेन!' सबरीनाची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. लोक त्या व्यक्तीचं खूप कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की, आजच्या काळात अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. तर काही लोकं असही म्हणतायेत की, ती व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने तिथे बसली असावी. आणि तितक्यात ती गाढ झोपेतून अचानक जाग झाली असावी, म्हणून त्याने ही स्टोरी तयार केली असावी.