मस्तीच्या मूडमध्ये दिसली सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर, पोस्ट व्हायरल

वेगळ्याच मूडमध्ये आहे सारा तेंडुलकर 

Updated: Jun 12, 2021, 01:55 PM IST
मस्तीच्या मूडमध्ये दिसली सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर, पोस्ट व्हायरल

मुंबई : टीम इंडिया (Team India) चा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने आपल्या आयुष्यात खूप प्रशंसा मिळवली आहे. आता सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) खूप चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर सारा तेंडुलकरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

वेगळ्याच मूडमध्ये आहे सारा तेंडुलकर 

सारा तेंडुलकरने 11 एप्रिल रोजी आपल्या इंस्टाग्रामवर रील पोस्ट केल्या आहेत. या व्हिडिओत सारा वेगवेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. साराने क्रिम रंगाचा ओवरसाइज्ड स्वेटशर्ट घातला आहे. सोबतच तिने चष्मा देखील लावला आहे. तिने आपला मेकअप अतिशय मिनिमम आहे. आपल्या कॅप्शनमध्ये साराने इमोजी शेअर केलेत. 

जुलै महिन्यात शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. अर्थात त्यात खास असे काहीच नव्हते. पण या दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक साम्य होते. हे साम्य म्हणजे फोटोच्या खालील लिहलेली कॅप्शन होय. सारा आणि शुभमन यांनी आपल्या फोटो खाली दोन डोळ्यांच्या इमोजीसह i spy असे लिहले. विशेष म्हणजे दोघांनी एकाच दिवशी फोटो शेअर केले होते.

या दोघांच्यात काही सुरू आहे की नाही हे माहित नाही. पण ही चर्चा आणखी जोरात पुन्हा सुरू झाली आहे. त्याचे कारण ठरले आहे, साराची नवी इस्टाग्रामवरील स्टोरी होय. बुधवारी साराने एक इस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. ही पोस्ट मुंबई आणि कोलकाता या दोन संघातील सामन्यातील होती.