'सेक्रेड गेम्स २' : 'अपनी कहानी चिपक‌ गयी‌ है आपको.....'

नव्या‌ व्हिडिओमध्ये गायतोंडे आणि सरताज सिंग एकमेकांच्या समोर येणार आहेत. 

Updated: Jul 30, 2019, 03:51 PM IST
'सेक्रेड गेम्स २' : 'अपनी कहानी चिपक‌ गयी‌ है आपको.....' title=

मुंबई : 'सेक्रेड गेम्स२' मधील कहणी एक वेगळे वळण घेणार आहे. ‘बिच्छु हैं.... अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे पुन्हा परत येत आहे. त्यामुळे दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'सेक्रेड गेम्स२' या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.‌हा ट्रेलर‌ पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या वेब सीरिजबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांमध्ये आणखी या वेब सीरिजची उत्सुकता अशीच‌ ताणून धरण्यासाठी नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवरुन ‘सेक्रेड गेम्स २’चा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

नव्या‌ व्हिडिओमध्ये गायतोंडे आणि सरताज सिंग एकमेकांच्या समोर येणार आहेत. 'सेक्रेड गेम्स २’च्या नव्या सीझनमध्ये अनेक प्रश्नांची प्रेक्षकांना उत्तर मिळणार आहेत. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘भगवान को मानते हो, पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है?’, असं म्हणणाऱ्या गायतोंडेच्या या वाक्यामध्ये अनेक गोष्टींचा अर्थ दडलेला आहे. 

यावेळी ‘सेक्रेड गेम्स२’ मध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आणखी नवीन वळणं घेणार आहे. 'सेक्रेड गेम्स२' मध्ये अनेक गोष्टी उघडकीस येणार आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर ही वेब सीरिज आधारित आहे.

या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून फार पसंती मिळाली आहे. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे असे डायलॉग सोशल मीडियावर फार हिट ठरले होते.