नकली स्टेरॉयड विकायचा मनोज पाटील, साहिल खानचा खळबळजनक खुलासा

बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानचे नाव चर्चेत आले.

Updated: Sep 17, 2021, 10:05 AM IST
नकली स्टेरॉयड विकायचा मनोज पाटील, साहिल खानचा खळबळजनक खुलासा  title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानचे नाव चर्चेत आले, जेव्हा मिस्टर इंडिया मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये साहिल दोषी असल्याचं म्हटलं. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे. एवढेच नाही तर त्याने देशभरात अनेक बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मनोजने साहिलवर स्वत: ला मानसिक छळ केल्याचा आणि स्वतःला सोशल मीडिया गुंडगिरीचा बळी बनवल्याचा आरोप केला आहे.

मनोज पाटीलने केलेल्या आरोपांनंतर साहिल खानने माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. सोबतच साहिल खानने मनोज पाटीलवर अनेक आरोप केले आहेत.

साहिल म्हणाला की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदारला 2 लाख रुपयांचे बनावट आणि इक्सापायर स्टेरॉयड विकले होते. साहिलने या गोष्टीचा खुलासा करत स्टेरॉयड विकत घेतल्याच्या पावत्या आणि इंजेक्शन देखील दाखवल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साहिल खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मनोज पाटील विरोधात एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यात तो फसवणूक करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.