करियरच्या मार्गात या कलाकारांना Ego पडला महागात

Ego मुळे प्रसिद्ध कलाकारांच्या करियरला लागलं ग्रहण

Updated: Sep 17, 2021, 09:53 AM IST
करियरच्या मार्गात या कलाकारांना Ego पडला महागात

मुंबई : संपत्ती, प्रसिद्धी मिळाली की  कलाकारांमध्ये निर्माण होतो तो म्हणजे. Ego हा शब्द फार लहान वाटत असला तरी खऱ्या आयुष्यावर त्याचे परिणाम फार वाईट होतात. परिणामी Egoमुळे मोठ्या नुकसानाचा सामना देखील करावा लागतो. अशाचं काही गोष्टी बॉलिवूड कलाकारांसोबत देखील घडल्या आहेत. Egoमुळे कलाकारंच्या हातून मोठे चित्रपट देखील निसटले आहेत. अशाचं काही कलाकारांची यादी आज आपण पाहाणार आहोत. 

अमिताभ बच्चन - सुभाष घाई
अमिताभ बच्चन - सुभाष घाई दोघे मिळून बिग बजेट चित्रपटाची निर्मिती करणार होते. सर्व काही सुरळीच सुरू होतं. पण दोघांमध्ये  क्रिएटीव्ह डिफरेन्स असल्यामुळे बिग बींनी माघार घेतली. 

अभिनेत्री चित्रांगदा सिंग 
अभिनेत्री चित्रांगदा सिंगने अभिनेता नवाजुद्दीन स्टारर 'बाबूमोशाय बंदूकबाज' चित्रपटातून काढता पाय घेतला. त्याला कारण देखील तसचं आहे. चित्रपटात इंटिमेट सिन असल्याचं कळताचं ती चित्रपट नाकारला. 

अभिनेता सोनू सूद 
'मणिकर्णिका' चित्रपटासाठी सोनूने नकार दिला. महिला दिग्दर्शकासोबत काम करणार नाही... अशी चर्चा होती. यावर सोनू म्हणाला, 'हॅप्पी न्यू्यर' चित्रपटात देखील महिला दिग्दर्शक होती. पण 'मणिकर्णिका' चित्रपटात दोन दिग्दर्शक असल्यामुळे सोनूने चित्रपटाला  नकार दिला. 

अभिनेत्री कंगना रानौत
कंगनाला अभिनेता सलमान खान स्टारर 'सुलतान' चित्रपटासाठी ऑफर मिळाली. पण सलमानसोबत स्क्रिन स्पेस कमी  होवू शकतो. यामुळे तिने चित्रपटास नकार दिला.