सर्वाधिक मानधन घेणारी दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री का करत नाही मेकअप?

या मागचं काय आहे कारण?

Updated: May 13, 2021, 10:17 AM IST
सर्वाधिक मानधन घेणारी दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री का करत नाही मेकअप? title=

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री सई पल्लवीने आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. आपल्या सिनेमाने सई पल्लवीने सगळ्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केली आहे. नुकताच पल्लवीचा वाढदिवस झाला आहे. देशभरातून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमधील सिनेमात काम केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

सईने 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'प्रेमम' या सिनेमातून करिअरची सुरूवात झाली आहे. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सईने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. 

सईची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मोठ्यातल्या मोठ्या सिनेमातही अगदी साधी आणि मेकअप न करता दिसून येते. बऱ्याच लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. सध्याच्या काळात मेकअपला अधिक महत्व असताना सई पल्लवी आपलं वेगळेपण टिकून ठेवते. 

सई पल्लवीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'प्रेमम सिनेमाचे दिग्दर्शक अल्फन्स पुथ्रेन यांनी त्यांना सिनेमात मेकअपशिवाय दिसण्यासाठी प्रोत्साहित केले होते. सईने त्यांच्यानंतर ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्यातील अनेकांनी नो मेकअप करण्याकरता प्रोत्साहन दिलं आहे.' 

विशेष म्हणजे सई पल्लवीने जेव्हा फेअरनेस क्रीमची जाहिरात मिळाली तेव्हापासून चर्चेत आली होती. याकरता दोन कोटी रुपये फी दिली जात होती. मात्र सईने त्या जाहिरातीला नकार दिला आहे. अशा जाहिराती करण्यापेक्षा मी घरी राहीन. सई पल्लवी यशस्वी अभिनेत्री होण्या व्यतिरिक्त डॉक्टर देखील होती. सईने जॉर्जियाच्या टिबिलीसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस पदवी घेतली आहे.  

२०१४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिला 'प्रेमम'मधील 'मलार'च्या भूमिकेची ऑफर मिळाली. या चित्रपटासाठी तिनं साऊथचा फिल्मफेअरही जिंकला. त्यानंतर तिला मल्याळम चित्रपट 'काली'ची ऑफर मिळाली. साईच्या पहिल्या चित्रपटाला उत्तम यश मिळालं होतं. तिनं हा चित्रपटही स्वीकारला. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पण तिनं नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. आतापर्यंत साई पल्लवीनं १५ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.