'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यानंतर कास्ट, सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींची चर्चा होत आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी शाकाहारी आहे की मांसाहारी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. याला साई पल्लवीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.
नितेश तिवारी यांनी 'रामायण' या सिनेमाची घोषणा केली. तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारत आहे तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. जेव्हापासून ही भूमिका साई पल्लवी करत आहे तेव्हापासून तिला तू शाकाहारी आहेस की मांसाहारी? असा प्रश्न विचारला जात आहे. या सगळ्यावर भडकून साई पल्लवीने खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
अफवांवर संतापलेल्या साई पल्लवीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे की, मी गप्प राहणे पसंत करते आणि अशा प्रसंगी काहीही बोलू शकत नाही." साईपल्लवीला वेगवेगळ्या मीडियामधून तू मांसाहार सोडलास का? असा प्रश्न विचारला जात होता. कारण ती या सिनेमात सितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अशी देखील चर्चा आहे की, साई पल्लवी शुटिंग किंवा इतर प्रवासा दरम्यान आपले शेफ सोबत घेऊन फिरते कारण ती शाकाहारीच आहे.
Most of the times, Almost every-time, I choose to stay silent whenever I see baseless rumours/ fabricated lies/ incorrect statements being spread with or without motives(God knows) but it’s high-time that I react as it keeps happening consistently and doesn’t seem to cease;… https://t.co/XXKcpyUbEC
— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) December 11, 2024
साई पल्लवी नेहमीच शाकाहारी राहिली आहे. अभिनेत्रीने एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की, ' मी कायम शाकाहारी आहे. मी कधीच कुणाला मरताना पाहू शकत नाही. मी कोणत्याच व्यक्तीला दुखवू शकत नाही तसेच मी हा विचार करु शकत नाही की, ठिक आहे तो यासाठी पात्र आहे.
साई पल्लवी तमिळ सिनेमा 'अमरन' मध्ये दिसली आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह यांची बुकी सीरीज 'इंडियाज मोस्ट फियरलेस ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हिरोज' वर आधारित आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.