'माझ्यासाठी खूप स्पेशल...', घटस्फोटानंतर अजूनही सई ताम्हणकरकडे आहे पहिल्या लग्नाची 'ही' आठवण

Sai Tamhankar Still Has This Special Thing From Her First Wedding : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नातील या गोष्टीविषयीची आठवण सांगितली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2024, 04:47 PM IST
'माझ्यासाठी खूप स्पेशल...', घटस्फोटानंतर अजूनही सई ताम्हणकरकडे आहे पहिल्या लग्नाची 'ही' आठवण  title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar Still Has This Special Thing From Her First Wedding : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आता फक्त मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत मर्यादीत राहिलेली नाही तर बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येते. अनेकदा तिच्या पोस्ट देखील चर्चेच असतात. दरम्यान, सईनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाची आठवण तिनं कशी जपून ठेवली हे सांगताना दिसते. 

सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सईनं ही मुलाखत 'हॉटरफ्लाय'ला दिली आहे. या मुलाखतीत सई तिचं घर, तिच्याकडे असलेली ज्वेलरी आणि कपडे या सगळ्यांविषयी सांगताना दिसते. त्याशिवाय जेव्हा सई तिच्या वॉडरोबकडे जाऊन तिच्याकडे असलेलं कपड्यांचं कलेक्शन दाखवत असताना तिनं तिचा एक ड्रेस दाखवला आणि ती म्हणाली, "हा ड्रेस माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. त्याचं कारण म्हणजे हा ड्रेस माझ्या लग्नातील साडीपासून शिवलेला आहे. मला लग्नातील साडी टाकून द्यायची नव्हती. त्यामुळे मी या साडीपासून चुडीदार ड्रेस शिवून घेतला." 

Sai Tamhankar Still Has This Special Thing From Her Wedding

त्यानंतर सईनं सांगितलं की तिची ही साडी लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली होती. त्याविषयी बोलताना सई म्हणाली, "ही साडी भारतातील मोठा फॅशन डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली होती. तर अशा नाजूक साड्या मुंबईच्या या दमट वातावरणात कपाटात ठेवून खराब होतात. मग मी हा ड्रेस शिवला... हा मी कितीही वेळा परत परत घालू शकते. कारण माझ्यासाठी ही साडी खूप स्पेशल आहे." 

वैवाहिक आयुष्य

सईच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर ती निर्माता अमित गोसावीसोबत जवळपास 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. मग 7 एप्रिल 2012 रोजी त्यांनी साखरपुडा केला आणि 15 डिसेंबर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, त्यांचं हे लग्न फार काळ काही टकलं नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 

हेही वाचा : 'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा

सईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सलकरच नागराज मंजुळे यांच्या मटका किंगमध्ये दिसणार आहे. यावेळी सईसोबत अभिनेता विजय वर्मा देखील दिसणार आहे. त्यामुळे आता त्या दोघांना स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते आनंदीत आणि उस्तुक आहेत.