'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा

Sai Tamhankar Casting Couch : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2024, 02:55 PM IST
'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar Casting Couch : अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयानं छाप सोडली. अभिनयाच्या जोरावर आज सई इथवर पोहोचली आहे. सईनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सई चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.  

सईनं ही मुलाखतीत 'हॉटरफ्लाय'ला दिली होती. या मुलाखतीत सईनं तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. यावेळी सई म्हणाली "त्यानं मला भूमिकेसाठी ऑफर दिली. त्यानं सविस्तर सांगितलं अशी अशी भूमिका आहे वगैरे... पण तुला या लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करावं लागेल. हा मेसेज पाहिल्यानंतर मी लगेच त्याला म्हणाले की हा मेसेज तू तुझ्या आईला आणि वडिलांना फॉरवर्ड कर. मला यापुढे कधीच मेसेज किंवा फोन करु नकोस. आता या 15-20 वर्षांच्या काळात हे माझ्यासोबत पहिल्यांदाच आणि शेवटचं घडलं आहे. मुळात या सगळ्या प्रकरणेची शहानिशा करणं खूप कठीण आहे. कारण मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे? त्या व्यक्तीच्या फोनवरून खरंच त्यानंच मेसेज केला का? हे देखील माहित असणं गरजेचं असतं. ती व्यक्ती खरंच कोण आहे आणि काय करते वगरै काही माहित नसताना त्या व्यक्तीच्या मॅसेजला माझ्यामते तितकं प्राधान्य नाही." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

सई नेहमीच अशी बेधडकपणे तिच्या मनात जे आहे ते बोलताना दिसते. अनेकदा ट्रोलर्सला देखील ती सडेतोड उत्तर देताना दिसते. आजही सईच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये लाखो आहेत. दरम्यान, तिच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं कॉलेजमधील नाटक आणि मग मालिका अशी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सईनं एकामागे एक अशा 'तुझ्याविना', 'या गोजिरवाण्या घरात', 'कस्तुरी' गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. मोठ्या पडद्याविषयी बोलायचे झाल्यास तिनं 'गजनी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सईनं 'सनई चौघडे', 'क्लासमेट्स', 'दुनियादारी', 'नो एन्ट्री', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे' मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. त्याशिवाय ती 'हंटर', 'भक्षक', 'इंडिया लॉकडाऊन', 'मिमी' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. तर 'मिमी' साठी तिला बेस्ट सपोर्टिंग पुरस्तार देखील मिळाला होता.