Divorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

सईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Updated: Nov 9, 2022, 04:21 PM IST
Divorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा title=

मुंबई : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं मिमी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. या चित्रपटानंतर सईनं ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं. तिच्या भूमिकांमुळे तसेच तिच्या कामामुळे सई चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सईनं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविषयी एक मोठा खुलासा केला आहे. (Sai Tamhankar Talk About Her Ex Husband) 

सईनं तिचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपवून ठेवलेलं नाही. आता सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सई तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविषयी बोलताना म्हणाली की, 'ती अजुनही पूर्वाश्रमीच्या पतीच्या संपर्कात आहे. मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटले. ते क्षण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते.' 

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ कननची मुलाखत पाहा -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

घटस्फोटानंतरच्या पार्टी विषयी काय म्हणाली सई 

पुढे त्यांच्या घटस्फोटाविषयी सांगत सई म्हणाली, 'ज्या दिवशी आम्ही दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं. तसेच आमच्या घटस्फोटाबाबत सांगितलं. रात्रभर आम्ही मद्यपान केलं आणि धम्माल केली. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. त्याच्या नावाचे टॅटूही मी काढले आहे. अजूनही ते टॅटू तसेच आहे. एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. मग त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणूनही आजही ते टॅटू मी मिरवते.' सईच्या या उत्तरानंतर सिद्धार्थनेही तिचं कौतुक केले.' (Sai Tamhankar Talk About Her Ex Husband Says We Drank All Night During Party And Enjoyed) 

पुढे ग्लॅमर इंडस्ट्रीत (Glamour Industry) काम करताना कधी एकटेपणा जाणवतो का? असा प्रश्न विचारता सई म्हणाली, 'हो, मलाही बऱ्याचवेळा एकटेपणा जाणवतो. शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्याही काही भावनिक गरजा आहे. काम हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे पण ते आयुष्य नाही, हे समजायला मला बराच वेळ लागला. पण आता मला ते समजलंय.'