मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग ही जोडी एकेकाळी इंडस्ट्रीत चर्चेचा केंद्रबिंदू होती. आज आम्ही तुम्हाला सैफ आणि अमृताशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत जो खूपच रंजक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफची अमृताशी पहिली भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती.
अभिनेत्रीला पाहताच सैफ तिच्यावर फिदा झाला होता आणि काही वेळातच सैफने अमृताला डेटवर जाण्याची ऑफर दिली. मात्र, डेटवर जाण्याऐवजी अमृताने सैफला तिच्या घरी डिनरसाठी बोलावलं होते. आता आम्ही तुम्हाला सैफचा तो रंजक किस्सा सांगणार आहेत. जो ऐकून तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. यावेळी असं काहीसं घडलं की, सैफ पूर्ण दोन दिवस अमृताच्याच घरी थांबला. मात्र, जेव्हा निघण्याची वेळ आली तेव्हा सैफचा खिसा रिकामा झाला होता. सैफकडे घरी जाण्यासाठीही पैसे उरले नव्हते.
अशा परिस्थितीत अभिनेत्याने अमृताकडून 100 रुपये उधारी मागितली, ज्यावर अमृताने तिच्या कारच्या चाव्या सैफला दिल्या आणि कार घेवून जाण्यास सांगितली. मात्र, सैफने अभिनेत्रीला सांगितलं की, त्याला प्रॉडक्शन हाऊसची कार सोडेल मात्र अमृताने सैफला तिची कार घेवून जायला सांगितलं. जेणेकरून तो परत कार परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा भेटेल.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा विवाह 1991 मध्ये झाला. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनी परस्पर मतभेदांमुळे 2004 साली दोघांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळे झाले.