मुंबई : आज आम्ही तुम्हाला सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांचं लग्न 1991 मध्ये झालं होतं. सैफ आणि अमृताचं लग्न एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं. लग्नाच्यावेळी सैफ फक्त 21 वर्षांचा होता. तर अमृता सिंग 33 वर्षांची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ तेव्हा स्ट्रगलर होता. तर अमृता सिंग इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. सैफ-अमृताच्या लग्नाची जेवढी चर्चा होती. तेवढीच त्यांच्या घटस्फोटाच्याही चर्चा होती.
वृत्तानुसार, 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर सैफ अमृताने 2004 मध्ये घटस्फोट घेतला. असं म्हटलं जातं की, या दोन स्टार्समधील मतभेद खूप वाढले होते. ज्यामुळे घटस्फोट झाला. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्स या पलीकडेही कारणं देतात. बातम्यांनुसार, सैफच्या आयुष्यात रोजा कॅटालानो नावाच्या इटालियन मॉडेलची एन्ट्री झाली होती. इतकंच नाही तर सैफ आणि रोजाच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत रंगल्या होत्या.
या अफेअरची चर्चा सैफच्या रिलेशनशिपवर पडली आणि त्याचं घर तुटलं. सैफला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. त्याचवेळी घटस्फोटानंतर सैफला पोटगी म्हणून अमृताला ५ कोटींची मोठी रक्कम द्यावी लागली. सैफकडे द्यायला इतके पैसे नव्हते, त्यामुळे त्याने ही रक्कम अमृताला काही हप्त्यांमध्ये दिली.