'या' कारणामुळे शर्मिला टागोर सैफ-करीनाच्या लग्नाला नव्हत्या खुश

शर्मिला यांनी सैफ-करीनाच्या लग्नाबाबतच्या भावना केल्या व्यक्त 

Updated: Apr 28, 2021, 03:38 PM IST
'या' कारणामुळे शर्मिला टागोर सैफ-करीनाच्या लग्नाला नव्हत्या खुश

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांच्याबद्दल जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात. अगदी चाहत्यांपासून संपूर्ण जगापर्यंत सगळेच. अशीच एक जोडी आहे सैफ आणि करीनाची. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. हे लग्न अतिशय धुमधडाक्यात झालं. आता हे दोघं खूप आनंदी आहेत. अगदी एकमेकांवरील प्रेम शेअर, पोस्ट करत असतात. या दोघांच्या लग्नाच्या एक वर्षापूर्वीच सैफचे वडिल मंसूर अली खान पटौदी यांचं निधन झालं. 

2011 मध्ये सैफचे वडिल मंसूर अली खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं. पटौदी कुटुंबासाठी हा अतिशय कठिण काळ होता. या परिस्थितीत त्यांच्यासोबत करीन कपूर खान देखील होती. करीनाच्या 2011 सालच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. सप्टेंबर 2011 मध्ये ही घटना घडली आणि ऑक्टोबर 2012 मध्ये या दोघांचं लग्न झालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saba (@sabapataudi)

याच कारणामुळे शर्मिला टागोर सैफ-करीनाच्या लग्नात अजिबातच उत्साही नव्हत्या. त्यावेळी शर्मिला यांनी चक्क आपल्या कलेक्शनमधील अतिशय जुनी साडी नेसली होती. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की, तो आनंदाचा क्षण होता मी काय घालते हे महत्वाचं नव्हतं.