सैफला करीनापासून 'सेफ' राहण्याचा खिलाडी कुमारचा सल्ला; नेमकं प्रकरण काय वाचा

 सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं २०१२ साली लग्न झालं. 

Updated: May 28, 2022, 07:43 PM IST
सैफला करीनापासून 'सेफ' राहण्याचा खिलाडी कुमारचा सल्ला; नेमकं प्रकरण काय वाचा  title=

मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं २०१२ साली लग्न झालं.  हे आपणा सर्वांना माहीत आहे.  मात्र या लग्नाशी संबंधित अशा अनेक किस्से आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला करीना आणि सैफच्या लग्नाशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत. खरंतर, 2008 मध्ये आलेल्या 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करीना यांच्यात जवळीक वाढली होती.

'टशन' या चित्रपटात सैफ आणि करिनासोबत अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत होता. बातमीनुसार, अक्षय कुमारला माहित होतं की, सैफ आणि करीना एकमेकांना पसंत करतात. अशा परिस्थितीत अक्षय कुमारने सैफ अली खानला एक सल्ला दिला, खुद्द करीना कपूर खानने ट्विंकल खन्नाच्या चॅट शो 'ट्वीक इंडिया'मध्ये ही  माहिती दिली.

करीनाने सांगितलं की, अक्षय कुमारने सैफ अली खानला सल्ला दिला की, करीना कपूर एका डेंजर कुटुंबातील आहे. तिची काळजी घे. करीनाच्या म्हणण्यानुसार, सैफने अक्षयची ही गोष्ट खूप सकारात्मक अर्थाने घेतली आणि म्हणाला मी माझ्या बेबीची काळजी घेईन असं सांगितलं.

करीना कपूर खान पुढे म्हणते की, अक्षय कुमारच्या म्हणण्याचा असा अर्थ होता की, सैफने करीनाशी पंगा घेऊ नये. मात्र, काही वर्षे डेट केल्यानंतर सैफ-करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. सैफ आणि करिनाला दोन मुलं आहेत ज्यांची नावं तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान आहेत.