मुंबई : चंदीगड पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान यांना फसवणूकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहेत. सलमान खान आणि त्याची बहीण व्यतिरिक्त इतर 7 जणांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत ज्यांची चौकशी केली जाईल. एएनआयच्या ट्विटनुसार, चंदीगडचे एसपी केतन बन्सल म्हणाले, त्यांना 13 जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. यात काही गुन्हेगार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
काय आहे नेमकं प्रकरण?
एका वृत्तानुसार, अरुण गुप्ता नावाच्या एका व्यावसायिकाने यासंदर्भात सलमान खान आणि त्याच्या Being Human विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीविषयी सांगताना अरुण गुप्ता म्हणाले, ''बिइंग ह्युमनचे दोन कर्मचारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला बिइंग ह्युमनची फ्रँचायजी उघडायला सांगितली. आमची बोलणी झाली आणि आम्ही होकार दिला. त्यांनी आम्हाला सांगितलं की या सगळ्याला २ कोटींची गुंतवणूक करावी लागेल. त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की स्टोअरच्या उद्घाटनाला स्वत: सलमान खान येईल''.
Chandigarh police summon Bollywood actor Salman Khan, his sister Alvira Khan and 7 others associated with Being Human in an alleged case of fraud.
"They have been given till July 13 to reply. If there's anything criminal, action will be taken," Chandigarh SP Ketan Bansal. pic.twitter.com/Ye2dI97aN5
— ANI (@ANI) July 8, 2021
सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान याआधी आपल्या 'राधे' चित्रपटामुळे बराच चर्चेत होता. सलमानने बरीच अपील केल्यानंतरही हा चित्रपट लीक झाला होता आणि त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रारही दाखल केली. सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच अंतिम आणि टायगर 3 या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.
या चित्रपटांमध्ये दिसणार सलमान
सलमान खानच्या या दोन्ही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. एकीकडे टायगर सिरीजचे सगळे चित्रपट जबरदस्त हिट ठरले आहेत, तर दुसरीकडे सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा पहिल्यांदाच त्याच्यासोबत खलनायक म्हणून काम करताना दिसणार आहे.